पशुधनावर आधारित शेळी पालन, कुक्कुट पालन, व दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.28जुलै):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) ही उद्योग संचालनालयाअंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असुन या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करुन जास्तीत जास्त लोकांना, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारे ७ वी पास व १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवक/युवतींकरीता दि. ०९/०८/२०२१ ते २३/०८/२०२१ (दोन आठवडे) कालावधाचे ऑनलाईन “शेळी पालन, कुक्कुट पालन, व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम” आयोजित करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबडयांची विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय त्यांचे संगोपण व व्यवस्थापन, संतुलीत आहार, जिवनसत्वाचे महत्तव, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक/युवतींनी त्वरीत दि. ०८/०८/२०२१ पर्यंत “महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एमआडीसी रोड, गडचिरोली.” येथे स्वता:चा बायोडाटा, शाळा सेाडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर रहावे. अधिक माहितीसाठी श्री. के. व्ही. राठोड, प्रकल्प्‍ अधिकारी, मो.न. ९४०३०७८७७३, व सौ. वनश्री रामटेके, कार्यक्रम आयोजक, मो. न. ९७६६४९९५९९, यांच्याशी संपर्क साधावा. असे निवेदन करण्यात येत आहे असे के.व्ही.राठोड प्रकल्प अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
****