युवा काँग्रेसचे ब्रम्हपुरी तालुका माजी अध्यक्ष तथा कन्हाळगावचे माजी उपसरपंच नरेशभाऊ सहारे यांचा भाजपा मध्ये प्रवेश…

🔸ब्रम्हपुरी तालुक्यात काँग्रेस पक्षाला खिंडार…!

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.28जुलै):- बंटीभाऊ भांगडीया आमदार यांचे विकासकामांवर विश्वास ठेवून ब्रम्हपुरी तालुक्यातील नरेशभाऊ सहारे (युवा काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष ब्रम्हपुरी तथा माजी उपसरपंच कन्हाळगाव) यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.चिमुर विधानसभा क्षेत्रात विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे युवा तडफदार,गोर गरिबांचे कैवारी मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब आहेत. सतत गरिबांच्या मदतीला तत्पर असणारे आमदार साहेब यांनी जनतेची सेवा करतांना “जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा” समजून कार्य करीत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतांना चिमूर विधानसभा क्षेत्रात आक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू होऊ देणार नाही या भावनेतून स्व-खर्चाने क्षेत्रात आक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन अनेक कोरोना रुग्णांचे जीव वाचवले असे अनेक नियोजनात्मक चिमूर विधानसभा क्षेत्रात कार्यक्रम राबविण्यात आले व अजून असे अनेक सेवा कार्य सुरूच आहेत.

त्यामुळे चिमुर विधानसभा क्षेत्रात जनतेचे सेवा कार्य बघता मा. बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा मा.आमदार साहेबांचे निवासस्थानी नागपूर येथे श्री.नरेशभाऊ सहारे युवा काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष ब्रम्हपुरी तथा माजी उपसरपंच कन्हाळगाव यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेतला.आमदार साहेबांचे मार्गदर्शनात चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक विकासकामे होत असल्याने अनेक विविध पक्षातील पदाधिकारी भाजपा मध्ये नेहमीच प्रवेश घेत आहेत.

ब्रम्हपुरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांचा भाजपा मध्ये प्रवेश हा फक्त आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांच्या विकास कामांवर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा मध्ये प्रवेश आहे.ह्या प्रवेश प्रसंगी बंटीभाऊ भांगडीया आमदार विधानसभा क्षेत्र चिमूर, श्री.वसंत वारजूकर भाजपा कार्य.प्रदेश सदस्य महाराष्ट्र,श्री.कृष्णाजी सहारे भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर,श्री.संतोषभाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड,श्री.सिद्धूभाऊ भर्रे उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED