जावली तालुक्यातील पूरग्रस्तांना आंबेडकरी चळवळीच्या वतीने मदतीचा हात – एकनाथ रोकडे

31

✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

जावली(दि.२९जुलै): – जावली तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला असून अती प्रमाणात लोकांचे नुकसान झालेले आहे संपूर्ण कुटुंबचे कुटुंब उधवस्त होऊन रस्त्यावर आली असून त्यांना मदत करण्यासाठी जावली तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे व भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष दशरथ कांबळे ,रिपाई चे मार्गदर्शक वसंतराव चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी स्वतः आर्थिक मदत केली.

आंबेडकरी संघटनेच्या वतीने जमा झालेल्या सोळा हजार रुपयांची आहाराचे पंधरा किट जावली तालुक्याचे तहसीलदार पोळ साहेब यांना देण्यात आले.प्रशासनामार्फत मदत पूरग्रस्त कुटुंबातील लोकांना सुपूर्द करण्यात येणार आहे. जावली तालुक्यातील आंबेडकरी संघटना पीडित लोकांना नेहमी मदत करते हे पुन्हा एकदा आपल्या कृतीतून रिपाई ने दाखवून सर्व समाज्यापुढे आदर्श निर्माण करून दिला एक हात मदतीचा देऊन जेवढे शक्य आहे तेवढी मदत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या पद्धतीने करून माणुसकीचे दर्शन घडवले.

पीडित लोकांना आजून लाभ मिळवून देण्यासाठी रिपाई प्रयत्न करणार अशी ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी दिली याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका अध्यक्ष दशरथ कांबळे ,रिपाई चे माजी तालुका अध्यक्ष डॉ संपतनाना कांबळे,कास्राईब कर्मचारी महासंघ संघटनेचे धनसिंग सोनवणे गुरुजी ,भागवत करडे सर,रिपाई चे सचिव संतोष चव्हाण , खजिनदार निलेश शिंदे भिकाजी कांबळे गुरुजी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

*चौकट* – पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देऊन जेवढे शक्य आहे तेवढी मदत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या पद्धतीने करून माणुसकीचे दर्शन घडवले – एकनाथ रोकडे