नागेश जगताप यांची जिल्हा अध्यक्ष पदावरुन माहिती अधिकार महासंघाने केली हकालपट्टी

20
✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

रायगड(दि.30जुलै):-मांहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणुन नागेश जगताप यांची वर्षाभरापूर्वी नियुक्ति करण्यात आली होती .मध्यंतरी त्यांचे कार्य असमाधानकारक असून त्यांच्या विरुद्ध राज्य कार्यकारिणी कड़ें वारंवार अनेक तक्रारी येत होत्या. नागेश जगताप यांनी महासंघमध्ये गैरवर्तन आणि शिस्तभंग केल्याबद्दल दिनांक 25 जुलै 2021 रोजी त्यांना तड़काफड़की पदमुक्त करून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मधून बाहेर करण्यात आले आहे . याविषयी पत्रक काढून महासंघातील सर्व तालुका व जिल्हा पदाधिकारी आणि सर्व सक्रिय सभासद कार्यकर्त्याना जाहिर सूचना देण्यात आल्या आहे.

नागेश जगताप व त्यांचे कोणतेही कृत्य, त्यांची अन्य संघटना, त्यांचे आर्थिक उपक्रम यांच्याशी मांहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचें पदाधिकारी व राज्यातील नोंदनीकृत अन्य सर्व कार्यकर्ता यांचा कोणताही संबंध नाहीच. महासंघाचे नाव वापरून नागेश जगताप जर काही आर्थिक व्यवहार किंवा अन्य उपक्रम करत असतील तर त्यासाठी महासंघ कधीही जवाबदार राहणार नाही, याची गंभीर नोंद घ्यावी असा सतर्कतेचा इशारा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर आणि राज्य कार्याध्यक्ष शेखऱ कोलते यांनी दिला आहे .