चिपळून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पथक रवाना

19

🔹जमाते इस्लामी हिंद ,आय .आर. डब्ल्यू ,युथ विंग, मदतीसाठी सज्ज

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका,प्रतिनिधी उमरखेड(मो:-9823995466

उमरखेड(दि.31जुलै):-मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कोकण भागातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.
तेथील लोकांना तातडीने मदत हवी आहे. त्याची गरज लक्षात घेऊन होऊन जमात-ए-इस्लामी हिंद जनसेवा विभागाअंतर्गत आयडियल रिलीफ विंग आणि युथ विंग चिपळूणच्या पूरग्रस्त लोकांना मदत करत आहे .

जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिजवार्नूहमान खान यांनी निवेदन जारी करून लोकांना मदत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे.उमरखेड चे आयडीयल रिलीफ विंग ( IRW ) चे कार्यकर्त अमीरु मुजाहिद अ .समद आणि आवेज अतिक बागवान हे मदत पथकात सहभागी झाले आहेत.

जमाअते इस्लामी हिंद या समाजसेवी संघटनेच्या जनसेवा विभागाअंतर्गत नोंदणीकृत आयडीयल रिलीफ कमेटी
ट्रस्ट द्वारा मदतकार्य सतत चालू आहे. संघटनेचे डीजास्टर मॅनेजमेन्ट प्रशिक्षित 15O कार्यकर्ते त्या ठिकाणी कार्य करत आहेत.मेडीकल कॅम्प, मोबाईल मेडीकल कॅम्प, तयार अन्न पिशव्या, राशन किट, पाणी बोटल, ब्लॅकेट्स, एमरजंसी आर्थिक मदत, पाण्याचे टाके, विहीरी सफाई इत्यादी कामे सुरू आहेत.

उमरखेड शहरातुन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आय.आर.डबल्यु चे दोन कार्यकर्त मदत कार्यासाठी रवाना झाले असुन युथ विंगचे चार कार्यकर्ते परवा रवाना होणार आहेत. जमाअत ए इस्लामी हिंदच्या कार्यालया समोरुन कार्यकर्तांना रवाना करतांना स्थानिक अध्यक्ष काझी जहीरोद्दीन यांनी अल्लाह- ईश्वरला प्रार्थना केली की,तो त्यांची सुरक्षा करो, त्यांना आरोग्यदेवो, जास्तीत जास्त लोकांची सेवा त्यांचे हातुन घडो. हया प्रार्थनेत्यांना रवाना करण्यात आले.