वाळकी ता.जि.अहमदनगर गावात साकार होणार सासू – सुनाचे स्मारक – अशोक आबा लोखंडे

    43

    ?सासू – सुनेचे एकत्रित स्मारक असणारे वाळकी ता.जि.अहमदनगर महाराष्ट्रातील पहिले गाव होणार….!!!

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.31जुलै):-सासू आणि सून म्हणजे विळ्या भोपळ्याचे नाते.सारखे दोघीमध्ये तू – तू,मैं – मैं चालत असलेले नाते.जणू काही पिढ्या न पिढ्याच्या पक्क्या हाड वैरी…सासू कधी आई होत नाही आणि सून कधी मुलगी होत नाही.पण समाजात वावरताना असे ही काही उदाहरणे आहेत,काही कुटुंबे आहेत की,जिथे सासू आणि सून ह्या माय – लेकी प्रमाणे एकत्र नांदतात.गुण्या गोविंदाने आयुष्य जगतात.त्यापैकी एक सासू – सुनेचे जोडी वाळकी गावात होती.स्वर्गीय आसराबाई कोंडीबा लोखंडे ह्या सासू आणि स्वर्गीय सुमन भागचंद लोखंडे ह्या त्यांच्या सूनबाई.लौकिक अर्थाने त्या सासू – सून होत्या.पण त्यांच्याकडे पाहिले की,त्या सासू – सून आहेत की,माय- लेकी हा प्रश्न पाहणाऱ्याला पडायचा,इतके त्यांचे नाते घट्ट होते.

    स्वर्गीय आसराबाई लोखंडे म्हणजे एक संघर्ष रणरणागणी.पतीची साथ नसताना त्यांनी स्वतः संघर्ष करुन कष्ट करून आपल्या मुलाला शिकवले.त्याला शिक्षक बनवले.स्वतः निरक्षर असताना मुलासाठी शिकलेली बायको शोधली,लग्न झाल्यावर सूनबाईला डी.एड्.ला पुणे येथे पाठविले.अशाप्रकारे मुलगा व सून दोघेही नोकरीला लागले.स्वर्गीय सुमनताई लोखंडे ह्या एक सुसंस्कारित निर्मळ आणि परोपकारी व्यक्तीमत्व होते.त्यांच्या लहानपणी त्यांचे माता – पित्यांचे छत्र हरपले होते.त्यांचा सांभाळ हा मावशी आणि काका यांनीच केला होता मातृ सुखाला त्या परक्या झाल्या होत्या.त्यांनी सासूलाच आई मानले.आयुष्यभर त्यांची इमाने,इतबारे सेवा केली.स्वतः शिक्षिका असताना तो बडेजाव न मिरवता आदर्श सून कशी असावी याचा आदर्श त्यांनी घालून दिला.सासूची आज्ञा त्यांनी पाळली.त्यांचा शब्द प्रमाण मानून त्यांनी सासूची सेवा केली.

    सन २००० साली स्वर्गीय आसराबाई लोखंडे यांचे निधन झाले.त्यांच्या निधनानंतर त्यांचे नातू आणि सुमनताई लोखंडे यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते आणि प्राथमिक शिक्षक जि.प.प्रा.शा.ठोंबळसांगवी,केंद्र – पिंपळा,ता.आष्टी,जि.बीड येथे कार्यरत असणारे अशोक आबा लोखंडे यांनी आज्जीच्या स्मरणार्थ आसराबाई लोखंडे सेवा भावी संस्था स्थापन केली.त्या संस्थे मार्फत सामाजिक कार्य सुरु केले.आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.समाजातील वंचित घटक,अनाथ,निराधार यांना मदत केली.संस्थे तर्फे स्वर्गीय आसराबाई लोखंडे यांचे स्मारक उभारण्याचे नियोजन त्यांचे नातू अशोक आबा लोखंडे यांनी ठरवले आणि हा विचार त्यांनी आपल्या आई जवळ बोलून दाखवला.क्षणाचाही विचार न करता त्यांची आई आणि आसराबाई यांंची सून सुमनताई लोखंडे यांनी मान्यता दिली.नुसती मान्यता दिली नाही तर त्या स्मारकाला येणारा संपूर्ण बांधकाम खर्च रुपये ३ लाख ही दिले.आपल्या सासूच्या स्मारकासाठी ३ लाख रुपये मदत देणारी सुमनताई लोखंडे ह्या महाराष्ट्रातील पहिल्या सूनबाई असाव्यात.सलाम त्या आदर्श सुनेला.अशी सून प्रत्येक घरात जन्माला आली तर प्रत्येक घराचे नंदनवन व्हायला वेळ नाही लागणार नाही.

    अश्या आदर्श सूनबाई सुमनताई लोखंडे यांचे २७ एप्रिल रोजी कोरोना ने निधन झाले.दोघी सासू – सून वैकुंठवासी झाल्या.पण जाताना आपल्या कीर्तीचा,संस्काराचा ठेवा मागे ठेवून गेल्या.त्या दोघींचाही वारसा अशोक आबा लोखंडे हे चालवतात.त्या दोघी म्हणजे अशोक लोखंडे यांच्या आजी आणि आई.त्यांच्या सहवासात त्यांची जडणघडण झाली आहे.त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले आहेत.ह्या संस्काराला लक्षात ठेवून अशोक आबा लोखंडे यांनी सासू आणि सून यांचे एकत्रित स्मारक बांधण्याचे स्वप्न पाहिले आहे.स्मारकाचे काम सुरू केले आहे.या आदर्श सासू आणि सुन यांच्या स्मारकापासून सर्व सासू आणि सून यांनी प्रेणा घेऊन गुण्या गोविंदाने आयुष्य जगावे असा हेतू आहे.सासू ने सुनेला मुलगी मानावे.सुनेने सासू ला आई मानावे एकढाच माफक उद्देश आहे.स्वर्गीय सुमनताई लोखंडे यांच्या प्रथम स्मृतीदिनी १४ मार्च २०२२ रोजी या आदर्श सासू आणि सून यांच्या स्मारकाचे अनावरण होणार आहे.हा अनावरण सोहळा वाळकी ता.जि.अहमदनगर गावांसाठी अभिमानाचा सोहळा ठरणार आहे.कारण सासू आणि सून यांचे एकत्रित स्मारक असणारे वाळकी ता.जि.अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरणार आहे.निश्चित ही गोष्ट वाळकीकरांसाठी अभिमानाची बाब ठरणार आहे.
    ————–
    स्वर्गीय आसराबाई लोखंडे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०१७ आणि २०१८ या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मी उपस्थित राहिलेलो आहे.तेव्हा अशोक लोखंडे यांचा जवळून परिचय झाला.आपल्या आजीवर अतिशय जीव असणारा नातू.आपल्या आजीची स्मृती चिरंतन टिकावी म्हणून रात्रंदिवस धडपडणारा ध्येयवेडा नातू मी अशोक लोखंडे सारखा दुसरा पाहिला नाही.
    श्री.डॉ.श्रीपाल सबनीस
    अध्यक्ष – आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन