बिरसा क्रांतीदल संघटनेची अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय अमरावती येथे धडक

    36

    ✒️प्रतिनिधी विशेष (अमोल उत्तम जोगदंडे)मो:-8806583158

    यवतमाळ(दि.31जुलै):-बिरसा क्रांती दलाचे राज्य संघटक माजी सुभेदार नारायणराव पीलवंड यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील भिल्ल नाईकडा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी अप्पर आयुक्त पाटील साहेब यांना निवेदन दिले.
    यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात भिल्ल नाईकडा समाज वास्तव्य करून राहते .स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतर देखील भिल नाईकडा समाजाच्या गावात व त्यांच्या वस्तीत मूलभूत सुविधा देखील नाही . अनेक गावात रस्ते, वीज, पाणी नाही त्यांच्या जगण्याचे वांदे झाले आहे. नुकतीच कोरोना काळात महाराष्ट्र शासनाने गरीब आदिवासींना खावटी मंजूर केली ती देखील आदिवासी नाईकडा समाजाला अद्याप पर्यंत मिळाली नाही.

    ते लवकर मिळावी यासाठी आदिवासी समाज दोन वर्षांपासून वाट पाहत आहे. या वेळी बिरसा क्रांती दलाचेअमरावती जिल्हा अध्यक्ष श्रीकांत आत्राम व श्री अर्जुन भाऊ यूनाते तसेच आर्णि तालुका अध्यक्ष रामेश्वर ढगे, उमरखेड तालुका उपाअध्यक्ष अरुण तिळेवाड, रामदास धडगाव , अमोल पिला वन ,भीमराव वाघमोडे, विष्णू जोगी,दयाराम तारमेकवाढ, सौ सुनिता तारमेकवाड रमेश म्हैसे,भास्कर मित्तक ,संदीप देवकते ,गोपाल देवकते ,तातेराव भोकरे, हिरामण बडेवाढ, अविनाश मित्तक ,जनार्दन भोकरे, प्रल्हाद टिळे, राजू तिळे,सुखदेव होलगरे, दिपक तिळे इत्यादी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    प्रतिनिधी(अमोल उत्तम जोगदंडे)8806583158