भटके व विमुक्त आरक्षण बचाव परिषदेस मोठया संख्येने उपस्थीत राहावे-डॉ वैष्णवकुचेकर

21

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागिय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.31जुल):-प्रस्थापित राजकिय पक्षाकडुन भटक्या व विमुक्त चळवळीची नेहमीच दिशाभुल करण्यात आली
या समाजाचा केवळ मतापुरताच वापर करून त्यांना राजकिय सत्तेपासुन दुर ठेवण्याचे षंडयंत्र रचले गेले याचाच भाग म्हणुन ओबीसीचे राजकिय आरक्षण संपुष्टात आणण्याचा घाट घातला जात आहे राजकिय आरक्षण बचाव संदर्भात पुढील ध्येय धोरणे निश्चीत करण्यासाठी भारतीय भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने भटके विमुक्त आरक्षण बचाव परिषदेचे आयोजन बीड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह येथे दि ३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता केले आहे.

या परिषदेचे उदघाटन भारतीय भटके विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा,सुधीर अनवले यांच्या हस्ते होणार आहे तर मार्गदर्शक म्हणुन प्रा,शिवराज बांगर पाटील प्रदेश अध्यक्ष उसतोड कामगार संघटना तथा वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हाध्यक्ष प्रा,प्रशांत ओगले,डॉ गणेश खेमाडे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख वंचित बहुजन आघाडी,प्रा,माने एन ,एस, डी,बी,गायकवाड , नाना गुजांळ, छगण गुजांळ प्रा ,अंकुश चव्हाण ईत्यादी उपस्थीत राहणार आहेत या भटक्या व विमुक्त आरक्षण बचाव परिषदेस मोठया संख्येने राहण्याचे आवाहन भारतीय भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष ह,भ,प,डॉ कैशवदास वैष्णव व वंचितांचे युवक नेते विवेक कुचेकर यांनी केले आहे