भिवंडी पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे रविकांत पाटील यांची निवड

27

🔹उपसभापतीपदी भाजपचे गजानन आसवारे यांची बिनविरोध निवड

✒️अतुल उनवणे(भिवंडी/वज्रेश्वरी विशेष प्रतिनिधी)

भिवंडी(दि.31जुलै):-तालुक्यात पंचायत समिती सभापती, उपसभापती पदांच्या निवडणुकीची कमालीची चर्चा होताना दिसत आहेत. शिवसेना व भाजपच्या छुप्या युतीमुळे अवघ्या तीन-तीन महिन्यांसाठी सभापती-उपसभापतींची निवडणूक पार पाडली जात आहे.मावळत्या सभापती विद्या प्रकाश थळे व उपसभापती गुरुनाथ जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने तहसीलदार अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे रविकांत पाटील, तर उपसभापतीपदी गजानन आसवारे यांची बिनविरोध
निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित सभापती रविकांत पाटील यांनी १९८० पासून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासोबत कार्य करून शिवसेना पक्षाचे विचार जनमानसात रुजविण्याचे काम केले.१९८२ ते २०१७ पर्यंत सरपंच,उपसरपंच पदांवर कार्यरत राहून अनेक लोकोउपयोगी विकासकामे राबवली.

1982मध्ये शिवसेनेचे सरपंच म्हणून
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून जाहीर सत्कार समारंभ पार पडला होता.२०१७ मध्ये काटर्ड पंचायत समिती गणातून निवडून आलेले आसवारेही लोकांच्या अडीअडचणी जाणून स्थानिक पातळीवर लोकांना न्याय मिळवुन देतील असा विश्वास भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

चावे गणातून निवडून गेलेले पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदें,जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या आशीर्वादाने त्यांची सभापतीपदी निवड झाल्याने शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण आहे.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास थळे, भाजप तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, शिवसेना उपतालुकाप्रमुख हनुमा पाटील,भरत शेलार, सभापती विकास भोईर,उपसभापती जितेंद्र डाकी, उपसभापती गुरुनाथ जाधव,सभापती विद्या प्रकाश थळे, गटनेता भानुदास पाटील, नमितानीलेश गुरव, विनोद मुकादम, महेंद्र पाटील, प्रगती नितीन पाटील, सचिव राजेंद्र काबाडी, पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य तथा शिवसेना,भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.