युवासेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, रोजगाराचे प्रश्न सोडवा : जिल्हा विस्तारक अमित पाटील

    42

    ✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

    दोंडाईचा(दि.1ऑगस्ट):- दोंडाईचा शहरात युवासेनेची मोठी ताकद निर्माण झाली असून युवासैनिकांनी युवासेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, रोजगाराचे प्रश्न सोडवावे, असे प्रतिपादन धुळे जिल्हा युवासेनेचे जिल्हा विस्तारक अमित पाटील यांनी येथे केले.दोंडाईचा येथील सुवर्णकार मंगल कार्यालय येथे शनिवार दि. 31 जुलै 2021 रोजी युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप संपन्न झाले.

    यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हायुवाधिकारी तथा युवासेनेचे सहसचिव ॲड.पंकज गोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हासंघटक कल्याण बागल, युवासेनेचे उपजिल्हायुवाधिकारी गणेश परदेशी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, ॲड.ज्ञानेश्वर पाटील, युवासेना उपशहरप्रमुख दिपक मराठे, आबा चित्ते, युवासेना तालुकायुवाधिकारी आकाश कोळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, ॲड.पंकज गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व्यक्त केले. याप्रसंगी युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना फेटे व शिवबंधन बांधून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलतांना श्री.पाटील म्हणाले की, युवासेनाप्रमुख ना.आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात युवासेनेची ताकद वाढत आहे.

    येथे उपस्थितांची झालेली गर्दी याची साक्ष देते. दोंडाईचा येथील युवासेना सज्ज झाली आहे. भविष्यात अशीच ताकद गावोगावी वाढल्यास राजकीय पक्षापेक्षा युवासेनेची मोठी ताकद निर्माण होईल. युवासेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, रोजगाराचे प्रश्न सोडवावे. चांगले काम करणाऱ्यांवर विरोधक सोशल मिडीयातून टिका करतात. आपणही यासाठी तयार रहावे. सत्य जनतेसमोर आणावे. यासाठी सोशल मिडीयाचा वापर करावा. तसेच पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असा सल्लाही श्री.पाटील यांनी दिला.

    ॲड.पंकज गोरे म्हणाले की, युवासेनेच्या माध्यमातून युवती-बहिणींची कोणी छेडखानी करत असेल तर त्याला युवासेनेच्या माध्यमातून धडा शिकवा. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, गाव तेथे शाखा, घर तेथे युवासैनिक तयार करा, असे आवाहन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना आकाश कोळी यांनी तर सुत्रसंचालन सागर पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप पवार, जगदीश पाटील, बापू राणा, सुमित देशमुख, गणेश विसावे, लखन मराठे, योगेश बोरसे, निखिल जयसिंघाणी, निलेश विसावे, सागर कोळी, राकेश पाटील, मोहित राजानी, मनोज कुंभार, सुरेश कोळी, रविंद्र सदाराव, रोहित सोलंकी, रोहित धनगर, अंबालाल पाटील, सुमित राजपुत, देवेंद्र अहिरे, जितू कोळी, राहुल गिरासे, चेतन साबळे, रोशन सोलंकी, ज्ञानेश्वर कोळी, शानाभाऊ कोळी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.