रक्तदान शिबिर घेऊन अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

20

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.1ऑगस्ट):- 2021 रोजी जगविख्यात साहित्यीक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्धी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नामदेव ससाने तर उदघाटक म्हणून भाजपा चे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा व प्रमुख आतिथी म्हणून न.प.चे उपाध्यक्ष अरविंद भोयर, महेश काळेश्वरकर, प्रा.डॉ. अनिल काळबांडे ,दतराव काळे ,राजु गायकवाड , शाहरुख पठाण व कृष्णा लांबटिळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार, दिलीप सुरते, प्रकाश दुधेवार, औदुंबर वृक्षसंवर्धन समीतीचे अध्यक्ष दिलीप भंडारे, अजय बेदरकर इत्यादी उपस्थित होते.

कोरोनाने मागील वर्षीपासून थैमान घातल्यामुळे सर्व कार्यक्रमावर निर्बंध असल्याने “अण्णाभाऊ साठे” ची जयंती ही प्रत्येक घरोघरी व्हावी..!
हा ऊद्देश डोळ्यासमोर ठेऊन शेवंतराव गायकवाड, रामदास काळे, दामोधर इंगोले यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.

जयंती निमित्त रक्तदान शिबिर
अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नगर परिषद सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन विभागाचे आमदार नामदेव ससाने भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार प्रा.डॉ अनिल काळबांडे,दत्तात्रय काळे, राजू गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून त्या मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्डचे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल भीमराव दिवेकर यांनी सुद्धा रक्तदान करून जयंती साजरी केली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी लहुजी शक्ती सेना उमरखेडचे जयकुमार बनसोड (शहराध्यक्ष), सोनू सोनटक्के (तालुकाध्यक्ष ),जनर्धन पडोळे, धर्मा गायकवाड (युवा. ता. प्रमुख), नागेश लांबटीळे (युवा. ता. उपाध्यक्ष), विष्णु ससाने , राहूल लांबटिळे, धर्मा गायकवाड अवधुत इंगोले ,साईनाथ लांबटिळे श्रीकुमार इंगोले आदिनी खूप परिश्रम घेतले.