गंजगाव येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन…

20

✒️अशोक हाकेबिलोली(ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.1ऑगस्ट):- तालुक्यातील मौजे गंजगाव येथे ग्रामपंचायतमध्ये लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठें यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असुन सर्व प्रथम सरपंच सुनिता हणमंत कनशेट्टे यांच्या हस्ते अाणणाभाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच सुनिता कनशेट्टे यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरीत्रावर आण्णाभाऊ यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान व त्यांची साहीत्यसंपदा यावर मनोगत व्यक्त केले.

यावेळी रेखा बसवंत बावलगावे उपसरपंच, पि.डी. वाघमारे ग्रामसेवक, साईनाथ गांजरे ग्रा.पं.ऑपरेटर, हाणमंत कनशेट्टे, बसवंत बावलगावे , गंगाधर जाधव, यादव ओनरवाड, गंगाधर हिवराळे, अन्वर पठाण, खंडु गायकवाड, मारोती घाटे,अरुणाबाई मठपती, रेखाबाई स्वामी,मारोती हिरले,गंगाधर घाटे, शंकर घाटे,बस्वराज पाटील,शुभम कनशेट्टे आदी उपस्थित होते.