भोलारामजी कांकरिया सेवाभावी संस्था यांच्या वतीने सन्मानपत्र व पुष्प गुच्छ देऊन सेवा दूत म्हणून केला सन्मान

    40

    ?समाजसेविका मंजुषाताई दर्डा यांचा स्तुत्य उपक्रम

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.2ऑगस्ट):-भोलाराम कांकरिया सेवाभावी संस्थां यांच्या वतीने दिनांक 31 जुलै रोजी समृद्धी हॉटेल या ठिकाणी मंजुषाताई दर्डा यांच्या संकल्पनेतून कोविडच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांनी काम केले त्यांचा भोलारामजी कांकरिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने सेवा दूत म्हणून सन्मानपत्र व पुष्प गुच्छ देऊन सन्मान करीत सत्कार करण्यात आला.
    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ ,वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत मुंडे ,पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर ,रमेश धोका ,ॲड.रमेश मोहोळकर,सुभाष गेल्डा हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

    स्वागत गीत पूनम संतोषजी तापडिया यांनी गायीले.
    प्रास्ताविक मंजुषाताई दर्डा यांनी केले. भारत गौरव पुरस्कार हा माझा एकटीचा नसून सर्वांचा आहे. वृद्ध व्यक्तीसाठी आधार ही संकल्पना व्यक्त करीत आधारच्या माध्यमातुन वृद्ध व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत अशी संकल्पना यावेळी मांडण्यात आली. सेवा दूत म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील ,तहसीलदार स्वरूप कंकाळ ,पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, प्रशांत काबरा, विजयकुमार भंडारी, सुभाषचंद गेल्डा , करंडे सर, शारदाबाई हाराळे, सुजाता पेकम, हर्ष आंधळे ,विठ्ठल चामे , जावेद खान, प्रवीण पाठक, सुहास पाठक, ॲड. मयूर लोडा, ज्ञानेश्वर महाराज, श्रीधर मुरकुटे, पत्रकार ,सवंगडी कट्टा, जनाई लायन्स क्लब यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .आधार या अर्जाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगला अच्छा,सिद्धार्थ दर्डा, शुभम अच्छा,शंकेश धोका,नंदकुमार सोमानी,संतोष तापड़िया, प्रदीप गेलड़ा,कार्यक्रमाच्या सूत्रसंचलण व आभार पुजा दर्डा यांनी केले.गोपी मुंडे सर यांनी मंजुषाताई दर्डा यांच्या समाज कार्यवारील डॉकमेट्री यावेळी साधर केली.