गटविकास अधिकारी मुंडे यांची कें.प्रा.शा.शिराळ शाळेला भेट

    39

    ?उपक्रमाची पाहणी करून शिक्षकांचे केले कौतुक

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.2ऑगस्ट):-तालुक्यातील केंद्रिय प्राथमिक शाळा शिराळ येथे शनिवार दि.३१ जुलै २०२१ रोजी सायंकाळी आष्टी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी भेट देऊन बाला उपक्रमांतर्गत चालू असलेल्या कामाची पाहणी केली व शालेय परिसर स्वच्छता व इतर कामे याबाबत समाधान व्यक्त करत शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले.

    शिराळ ता.आष्टी या शाळेत बाला उपक्रमाची अंमलबजावणी सुरु असून शाळेचे आदर्श मुख्याध्यापक संतोष दाणी यांनी गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,विस्तार अधिकारी धनंजय शिंदे,केंद्रप्रमुख त्रिंबक दिंडे व सर्व सहकारी शिक्षक यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले आहेत.लोकसहभागातून दाणी सरांनी जवळपास ३०००० रुपयांचा रंग, १५००० रुपयांची खडी,वाळू व रोख स्वरूपात १०००० रुपये तर श्रमदानातून ४०००० रुपये तर ५००० रुपयेची झाडे अशी एकूण १००००० रुपयांची मदत मिळवून शालेय इमारतीची रंगरंगोटी,झाडांना कठडे बांधणी,भिंतीवर विविध लेखन,वृक्षारोपण, हॅन्ड वॉश स्टेशन,महापुरुषांची चित्रे,पक्ष्यांना अन्न व पाणी यासाठी कुंड्या,झाडावर नावांच्या रेडियम पट्ट्या,अंतर मैल,खिडकीवर भौमितिक आकार अशी कामे केली असून माझे सुंदर कार्यालय या उपक्रमांतर्गत अतिशय देखणे कार्यालय तयार केले असून शालेय परिसरात पेविंग ब्लॉक बसविणार आहेत.
    या संपूर्ण कामाची पाहणी गटविकास अधिकारी मुंडे यांनी प्रत्यक्ष करून शाळेचे मुख्याध्यापक संतोष दाणी,शिक्षक परमेश्वर जगताप,राजू ढवण,श्रीम.मंगल झगडे,सतीश शिंदे यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

    यावेळी मुंडे यांचे शाळेच्या वतीने शाल,श्रीफळ,फेटा देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी यांना बाला उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवनवीन बाबींची सविस्तर माहिती दाणी सरांनी सांगितली.यावेळी मुंडे यांनी कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी,त्या संबधीचे नियम,मास्कचा वापर,सँनीटायझर,स्वच्छता,सोशल डिस्टन्स,विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास आदी विषयी सविस्तर मार्गदर्शन करत सूचना केल्या व शाळेला मदत करणार असल्याचे सांगितले.
    ———————————————-
    सायंकाळी ७ – ३० वाजता भेट देऊन देखील मुख्याध्यापक संतोष दाणी हे हजर होते व गटविकास अधिकारी यांना राबविण्यात आलेल्या सर्व बाबींची त्यांनी सविस्तर माहिती दिली.या उपक्रमाची पाहणी करत गटविकास अधिकारी यांनी तोंड भरून कौतुक करत अभिनंदन करून मदत दिलेल्या दात्यांचे आभार मानत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.