अंबोना तलाव परिसरात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन

58

✒️विशेष प्रतिनिधी(अमोल उत्तम जोगदंडे)

उमरखेड(दि.2ऑगस्ट):- येथील अंबोना तलाव परिसरात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था उमरखेड द्वारा जवळपास तीन हजार सीडबाँलची ची निर्मिती करण्यात आली. सीड्स बॉल म्हणजे काळी माती, शेणखत, गोमूत्र, यांच्या मिश्रणात एक किंवा दोन बिया घालून मातीचे गोळे बनवणे होय. या बाँल मध्ये पोषक मुल्य असल्यामुळे जमिनीत मुरे पर्यंत तग धरू शकतात. यामधून फुटलेल्या अंकुरातून कित्येक वृक्ष तयार होऊन ठिकाणी वृक्ष फुलवण्याचे हिरवे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.

सीताफळ ,जांभूळ, बोर ,कडूनिंब, केवडा ,आंबा, चिंच, कवट,टेभंरु,कुंभी, मोह, बेल ,इत्यादी अनेक वृक्षांच्या बिया संकलित करून त्यांच्यापासून सीड बॉल तयार करण्यात आले कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून पर्यावरण क्षेत्रामध्ये मोकळा श्वास घेतला आहे. मात्र प्रदूषण वृक्षतोड या कारणामुळे पर्यावरणावर टांगती तलवार कायम आहे .’वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ‘अरे हे संत तुकाराम महाराजांचे वचन जगप्रसिद्ध आहे परंतु त्यांचे वचन पुस्तका पुरते मर्यादित होऊन आचरणात न आल्यामुळे आज पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले आसले तरी; प्रदूषण मुक्त समस्यांच्या गुलामगिरीकडे देश वाटचाल करीत आहे.

ग्लोबल वार्मिंग,त्सुनामी, दुष्काळ, महापुर, नैसर्गिक आपत्ती आशा नानाविध कारणांमुळे देशात प्राणहानी आणि वित्त हाणी देखील वाढली आहे.निसर्ग हा मानवाला निरामय जीवन जगण्यासाठी भरभरून देतो; परंतु मानवाने निसर्गाचे अतिरेकी शोषण केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. वसुंधरेला वाचवण्यासाठी जंगलाचे क्षेत्र वाढविणे ही काळाची गरज आहे आणि हिरवे स्वप्न साकारण्यासाठी वृक्षारोपण चळवळ तळागाळातील माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था गेल्या अनेक वर्षापासून विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमासह सीड बॉल ची निर्मिती करून रस्त्याच्या कडेला निर्जन स्थळी टेकडीवर किंवा ओसाड माळरानावर टाकून तेथे हिरवे स्वप्न साकार करत आहे.सीडबाँलच्या निर्मिती साठी संस्थेचे दीपक ठाकरे, प्रभाकर दिघेवार, गजानन रासकर ,राजेश माने, गजानन वानखेडे, रामकिशन शिंदे कृषी पर्यवेक्षक मुळावा,मनोज कदम, श्रीराम बिजोरे, देविदास कानडे कमलेश राठोड ,काशिनाथ कुबडे ,रवी चांगले ,विजय नगरकर इत्यादींनी पुढाकार घेतला.