चार्वाक वनात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी संविधान घरांसंबधी मार्गदर्शन

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.2ऑगस्ट):-“लोकशाहीत देशाचे शासन आणि प्रशासन कसे चालवावे याचे मार्गदर्शन करणारा दस्तऐवज म्हणजे संविधान होय.संविधानांतील तरतुदीप्रमाणे देशाचा कारभार चालवावा लागतो.भारतासारख्या विविध जाती,धर्म,पंथ आणि संस्कृतीच्या देशाचे संविधान लिहिण्याचे अत्यंत जिकिरीचे काम डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय विद्वतांची बनलेल्या घटना समितीने केले आहे.भारतीय संविधानाने नागरिकांना मौलिक अधिकार दिले आहेत,म्हणून संविधानाचे संरक्षण होणे अत्यंत जरूरीचे आहे.अलीकडील काळात संविधानातील तरतुदीला तिलांजली देऊन कारभार करण्यात येत आहे आणि संविधानाचा सन्मान राखला जात नाही,याचे प्रमुख कारण म्हणजे नागरिकांत संविधानातील तरतुदीबाबत असलेले अज्ञान होय.

म्हणून संविधान जागृती होणे जरूरीचे आहे “असे प्रतिपादन चार्वाकवनाचे संचालक अॕड.अप्पाराव मैन्द यांनी केले. ते साहित्यिक तथा विचावंत लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांचे जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,’संविधानाचा वेळोवेळी होणाररा अनादर टाळण्यासाठी संविधानाबाबत नागरिकांत जागृती होणे जरूरीचे आहे ,म्हणून ‘ गाव/वार्ड तेथे संविधान घर ‘ ही योजना राबविण्याचे आवाहन राष्ट्रसेवा संध आणि बाबा आढाव,अॕड.बाळासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील इतर जनमान्य विचारवंतानी केले आहे. ही योजना फुले-आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन राबवावी ‘ असे आवाहन अॕड.अप्पाराव मैन्द यांनी करून संविधानातील तरतुदीबाबत थोडक्यात माहिती दिली.

कार्यक्रम चर्चा स्वरूपाचा होता. ‘संविधान घर ‘ या योजनेबाबत.चर्चा झाली. गोवर्धन मोहिते.से.नि.मुख्याध्यापक सु.रा.बनसोड बी.एस.बरडे यांनी भाग घेतला.चर्चा सुरू होण्यापूर्वी म.जोतीबा फुले, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना सु.रा.बानसोड,अॕड.अप्पारव मैंद ,गोवर्धन मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संचलन तुकाराम चौरे यांनी केले ,तर आभार बी.एस.बरडे यांनी मानले.कार्यक्रमास के.व्ही.मुनेश्वर,एस.आर. बोपीनवार,एस.के.हळसे,के.एस.धुळे,भारत कांबळे,भगवान खंदारे,संगिता कांबळे,कविता रंगारी,मिनाक्षी कांबळे,कल्पना राजेश ,कांता अरूण धुळेकर,छाया धुळध्वज,विश्वजित भगत,सुभाष दायमा,जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे,विनोद कांबळे आणि कृष्णा दांडेकर हे उपासक-उपासिका उपस्थित होते.