न्यु शिवरुद्राक्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य. संस्थापक अध्यक्ष व शंभुसेना युवा धुळे जिल्हाध्यक्ष जयदिप लौखे-मराठे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

24

✒️विशेष प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे)

धुळे(प्रतिनिधी):- धुळे जिल्ह्यातील वेल्हाणे गावाचे सुपुत्र व न्यु शिवरुद्राक्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य. संस्थापक अध्यक्ष व शंभुसेना सामाजिक संघटनेचे युवा धुळे जिल्हाध्यक्ष जयदिप लौखे-मराठे यांनी आज शिवसेना पक्षात अधिकृत रित्या जाहीर प्रवेश केला.काही दिवसांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून अनेक पक्षामध्ये आपला संपर्क वाढवत असतांना शिवसेना हाच एकमेव पक्ष आपल्या कामासाठी मदत करतो या भावनेतून पुन्हा एकदा शिवसेना या मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पक्षात प्रवेश केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धर्मवीर आण्णासाहेब हिलाल आण्णा माळी, युवासेना जिल्हाप्रमुख अँड.पंकज भाऊ गोरे, शिरुड उपविभाग प्रमुख बादल मामा पवार, युवासेनेचे भैय्या भाऊ कदम, केशव भाऊ माळी, सोनु माळी उपस्थित होते.या प्रवेशानंतर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मराठा समाजाचे नेते अतुल भाऊ सोनवणे, शिवसेनेचे महानगरप्रमुख व मराठा समाजाचे नेते मनोज भाऊ मोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत म्हस्के, व आदि शिवसैनिक/युवासैनिक, व मित्र परिवारांने भगवे अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जयदिप लौखे-मराठे यांच्या जाण्याने शिवसेनेला पुन्हा वेल्हाणे गावात सामाजिक कार्य करण्याचे दिवस येतील.