अंबाजोगाई स्व.रा.ती रुग्णालय बनले भ्रष्टाचाराचे कुरण. -शैलेश कांबळे

61

🔹रुग्णालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात वंचितचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई,तालुका प्रतिनिधी)मो:-9763463407

अंबाजोगाई(दि.4ऑगस्ट):-अंबाजोगाई महाराष्ट्रातील सर्वात मोठे गणले जाणारे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय म्हणून बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाई तालुक्यातील एकमेव रुग्णालय आहे. मराठवाडय़ातील अनेक भागातील लाखोंच्या संख्येने या ठिकाणी सर्व प्रकारच्या आजारी रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात, खाजगी रुग्णालयात रुग्णांची होणारी पिळवणूक व लाखांची भरमसाठ आकारण्यात येणारे बिल हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. म्हणून अनेक जन याच रुग्णालयात दाखल होण्याकरिता येतात. परंतु मागील कांही महीन्यात कोरनामुळे हाजरो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. ते याच रुग्णालयात यामुळे अनेकांनी याची धास्ती घेतली आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते जिल्हा उपाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई स्व.रा.ती परिसरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण हे वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आले.

त्याच बरोबर मागील काही वर्षांपासून या रुग्णालयातील भोंगळ कारभार सुरू आहे. हे वंचितच्या निदर्शनास आले. अनेक वेळा तक्रारी व RTI दाखल करून सुद्धा उत्तर मिळाले नाही. यामुळे दी. ३ रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण खालील प्रमाणे मागण्यासह करण्यात आले. स्वराती रूग्णालयातील निवासी कर्मचारी वर्ग ३,४व नर्सिग वसाहत परिसरातील स्वच्छता, नाले सफाई, चेंबर, यांची दुरुस्ती करावी.

कोविड – १९ काळात मेडिकल, इतर साहित्य खरेदी व बनावट बिले यांच्या चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. प्रवेश व्दार बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले त्याची चौकशी व्हावी ,धर्मशाळा ही रुग्णांच्या नातेवाईकांना खुली करण्यात यावी. मोफत औषधे क्रमांक ८हे २४तास खुले व्हावे. अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न कंञांटी कामगार यांना कायम रुजू करून घ्यावे. मोकाट कुत्र्यांचा व डुक्कर यांचा बंदोबस्त करावा. अशा विविध मागण्यांचे निवेदन हे डॉ. उपाधिक्षक पवार डॉ. नागेश स्व. रा. ती. यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले.

ते पुढे बोलताना म्हणाले की,कोरोनाची तिसरी लाट ही सामान्य माणसाच्या जिवावर बेतु नये, यामुळे अनेकांचे घरे उध्वस्त होण्यापासून वाचतील. यात बिड जिल्हय़ाचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री यांनी जातीने लक्ष घालावे यासाठी व चौकशीचे आदेश तात्काळ देण्यात यावे. हा केवळ एक इशारा आहे. असे मत व्यक्त केले. उपोषणास वंचित तालुका अध्यक्ष संजय तेलंग, प्रवक्ते गोविंद मस्के, देविदास बचुटे, वेदपाठक, सुशांत धावरे, अमोल जोगदंड, परमेश्वर जोगदंड, व्हावळे पाटील, तेजस गंडले, मेघराज कांबळे, स्वप्नील ओव्हाळ, ब्रिजेश इंगळे, नवनाथ पौळ, राहूल कासारे, उमेश शिंदेसह असंख्य आंदोलन कर्ते उपस्थित होते.