नंदू गट्टूवार राष्ट्रीय बजरंग दल च्या पुर्व विदर्भ प्रांत प्रभारी पदी नियुक्त.!

43

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.4ऑगस्ट):-नंदू गट्टूवार हे अनेक दिवसा पासून राष्ट्रीय बजरंग दल च्या माध्यमातून हिंदुत्ववादी लोकांना एकत्र करून संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करत असुन मागील काळात त्यांनी जण हिताचे प्रश्ण उचलून ते मार्गी लावले तसेच युवक युवती मोठ्या संख्येने त्यांचा नेतृत्वाखाली विदर्भातील गावा गावात काम करतात,ह्या सर्व कार्याला बघून पुन्हा त्यांचा वर विश्वास दाखवत राष्ट्रीय बजरंग दल ने त्यांची पूर्व विदर्भ प्रांत प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.

या प्रसंगी नंदू गट्टूवार यांनी संघटनेत काम करणाऱ्या सर्व वरीष्ठ मंडळी यांचे आभार मानले आणि सांगितले की येणाऱ्या काळात संघटना पूर्व विदर्भातील सरव्या शहर जिल्हा गाव तालुका प्रभाग वार्ड पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेल व युवक युवती कामगार शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्ण मार्गी लावण्यासाठी लढा देत राहु असे गट्टूवार म्हणाले