डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान अंतर्गत भाजपा कोरपना तालुका बैठक

39

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

कोरपना(दि.4ऑगस्ट):- भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान अंतर्गत श्रीकृष्ण सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीचे अध्यक्ष खुशाल भाऊ बोंडे (लोकसभा विस्तारक तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य), उद्घाटक श्री धर्मपाल मेश्राम (प्रदेश सचिव) उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे सुदर्शनजी निमकर (माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र), नारायण हिवरकर (भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष), सतीश भाऊ उपलंचीवार (विधानसभा विस्तारक), विशाल जी गज्जलवार जिल्हा सचिव,श्री किशोर भाऊ बावणे सहकार आघाडी प्रमुख,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री अरुण भाऊ मडावी सरपंच,श्री संजय भाऊ मुसळे माझी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष, श्री नथ्थुजी ढवस तालुका महासचिव,श्री आशिष ताजने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, श्री नुतनकुमार जिवणे पंचायत समिती सदस्य, श्री अमोल आसेकर नगरसेवक,श्री शशिकांत अडकिने,श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष कोरपना यांनी प्रास्ताविकात कोरपना तालुक्याचा शक्ती केंद्रप्रमुख,विस्तारक तथा इतर विषयाची माहिती दिली श्री खुशाल भाऊ बोंडे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी तालुक्याचा पूर्ण आढावा घेतला शक्ती केंद्रप्रमुख विस्तारक व इतर विषयावर सविस्तर अशी चर्चा केली व पुढील बुथ रचने विषयी माहिती दिली व प्रत्येकाने आपली जिम्मेदारी समजून कामामध्ये पारदर्शकता बाळगावी असे आवाहन केले.

 श्री धर्मपालजी मेश्राम प्रदेश सचिव यांनी बुथ रचनेविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले व तालुक्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य विजयजी रणदिवे माझी सरपंच, प्रमोदजी कोडापे माजी सरपंच,दिनेशजी खडसे, नारायण कोल्हे,यशवंत इंगळे, प्रमोद पायगन,जगदिश पिंपळकर, प्रमोदजी इटनकर, संजय चौधरी सत्यवान चामाटे,प्रमोद वराटे, पद्माकर दगडी,विजय पानघाटे, सागर दुर्वे मीडिया प्रमुख आधी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला शक्ती केंद्रप्रमुख, विस्तार,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री नारायण हिवरकर यांनी केले तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी मानले