पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील खुनाच्या गुन्हयात सेशन कोर्ट यांचा निकाल- आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.4ऑगस्ट):- सदर गुन्हयाची हकीकत अशा प्रकारे की पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील मौजा चांदगांव शेतशिवारात दि. २३/०८/२०१८ रोजी मृतक सौ. इंदुबाई ईश्वर कुथे वय ४५ वर्षे हिला तिचा पती फिर्यादी ईश्वर महादेव कुथे वय ५२ वर्ष रा. टिळकनगर ब्रम्हपुरी याने चांदगांव शेतशिवारातील त्याचे शेतात तुरीचा कचरा साफ करणेकरीता सकाळी १०/०० वा. सुमारास सोडले होते. सायंकाळी अं. ०५/०० वा. चे दरम्यान मृतक चा पती फिर्यादी ईश्वर कुथे हा तिला घेण्यासाठी शेतात गेला असता तो जखमी अवस्थेत पडलेली दिसली तिला ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेले असता ती मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषीत केले होते.

फिर्यादी ईश्वर महादेव कुथे याने त्याच्या पत्नीला कोणीतरी अज्ञात ईस्माने शस्त्राने वार करून मारले अशा फिर्यादी ईश्वर कुथे याने दिलेल्या रिपोर्ट वरून पो.स्टै. ब्रम्हपुरी येथे दि. २४/०८/२०१८ रोजी अप क. ७४८/२०१८ कलम ३०२ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयातील आरोपी हा मृतकचा पती फिर्यादी ईश्वर महादेव कुथे वय ५२ वर्ष टिळकनगर ब्रम्हपुरी हाच असल्याचे निष्पन्न करून त्याचेविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करून सदर गुन्हयाच्या खटल्याची सुनवाई मा. जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपुर येथे सुरू होती.

आज दि. ०३/०८/२०२१ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सदर अप क ७४८/ २०१८ कलम ३०२ भादवी फेस क्र. ८२ / २०१८ मध्ये निकाल पारीत करून आरोपी ईश्वर महादेव कुथे वय ५२ वर्ष रा. टिळकनगर ब्रम्हपुरी याला जन्मठेप व १०००/- रू दंड ईतकी शिक्षा सुनावली.सपोनि रघुनाथ कडके यांनी सदर गुन्हयाचा तपास करून आरोपीविरूदध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. सदर गुन्हयाचे खटल्यात जिल्हा सरकारी वकिल श्री पी.जी. घट्टुवार यांनी सरकारची बाजू मांडली तर कोर्ट पैरवी म्हणुन पो.हवा. रामदास कोरे य.न. ४१४ यांनी कामकाज पाहीले.