धनज येथे आदिवासी बांधवांना खावटी अनुदान किटचे वाटप

    97

    ✒️विशेष प्रतिनिधी(अमोल उत्तम जोगदंडे)

    धनज(दि.4ऑगस्ट):– अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आदिवासींना पावसाळ्यात माहे जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार उपलब्ध होत नाही. याच कारणाने या या कालावधीत त्यांची उपासमार होऊ नये म्हणून सन १९७८ पासून खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आली.त्याच धर्तीवर शासन निर्णय ९ सप्टेंबर २०२० नुसार आदिवासींना खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली.

    कोरणा विषाणूमुळे निर्माण झालेल्या आपात्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातींच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने खावटी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पन्नास टक्के म्हणजे दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्या मध्ये तर उर्वरित पन्नास टक्के अंतर्गत धान्य किराणा स्वरूपात खावटी कीट देण्यात येते या योजनेअंतर्गत आज धनज येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे ११७ लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले .सुरुवातीला कर्ज स्वरूपात असलेली ही योजना बंद होती मात्र राज्य शासनाने आदिवासी साठी दोन टप्प्यात ही योजना सुरु केली आहे. किराणा साहित्याची किट देण्यात येत असल्यामुळे कोरोणा च्या काळात आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

    महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने पि.ओ. ऑफिस पुसद अंतर्गत येणाऱ्या महात्मा मुंगसाजी आदिवासी आश्रम शाळा धनज यांच्या कर्मचाऱ्यांनी सर्वे करून खावटी अनुदानासाठी १७० अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी ११७ अर्ज मंजूर होऊन त्यांना आज किराणा किट साहित्य वाटप करण्यात आले .आदिवासी विकास विभागा अंतर्गत अनेक योजना राबविल्या जातात. यात भगवान बिरसा मुंडा शेतकरी स्वावलंबन योजना ,शबरी घरकुल योजना, शेतकऱ्यांसाठी पांढरकवडा अंतर्गत शेती साहित्यासाठी मिळणारे साहित्य इत्यादींचा समावेश आहे .किट वाटप करताना आज महात्मा मुंगसाजी आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापिका के .के. गाढवे मॅडम, अधीक्षक दत्तात्रय ठाकरे , शिक्षिका डिंपल प्रकाश पाचपुते ,अधीक्षिका डी.जे.चेंडोळे ,ममता दत्तात्रय निबोदे, बालाजी बळीराम मोळक, प्रकाश रामजी डोंगरे ,इत्यादी कर्मचारी किट वाटप करताना हजर होते .आज खावटी योजनेअंतर्गत असलेली कीट आदिवासी लाभार्थ्यासाठी किराणा स्वरूपात असलेल्या किटमध्ये बारा वस्तूंचा समावेश करण्यात आला.

    यात मटकी, चवळी ,हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर ,शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर ,मीठ ,चहापत्ती चा समावेश आहे .यावेळी गावातील सरपंच वनिता देवानंद पाचपुते, माजी सरपंच प्रकाश आमले ,जगदीशराव व्यवहारे,मुक्ता संजय झाटे उपसरपंच, उत्तम वाळके ,राजाराम वाळके डिलर, अनाजी बोंबले तंटामुक्ती अध्यक्ष,सखाराम गायकवाड रोजगार सेवक, सुभाष ग्यानबा झाटे,गजानन पुंजाजी वाळके, गजानन नथु आमले,कनिकनाथ श्रीराम गुहाडे सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.