नौकरीचे आमिष दाखविण्यारे मधुकर वाढई यांचेवर कारवाई करावी : अरविंद दडमल

26

🔸चिमूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल – शिक्षण क्षेत्रात खळबळ

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.5ऑगस्ट):-चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी असलेल्या गोन्दोडा येथील ग्रामगीता आश्रमशाळेचे सचिव मधुकर वाढई यांनी अरविंद दडमल यांचेकडून नौकरी लावून देण्यासाठी दीड लाख घेऊन शिक्षक पदावर नियुक्त करून देतो असे आमिष दाखवुन फसवणूक केल्या प्रकरणी मधुकर वाढई यांचेविरुद्ध चिमूर पोलिसात तक्रार केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

पोलीस स्टेशन चिमूर येथे दिनाक 2 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या तक्रारीत अरविंद दडमल यांनी म्हटले आहे की, मधुकर वाढई यांचेवर खोटी जाहिरात देणे, सुशिक्षित बेरोजगाराची फसवणूक करणे, मानसिक त्रास देणे, धोखादडी करणे, शाळा नियमाचा भंग करणे, चुकीचे व खोटे आमिष देणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कारणामुळे मधुकर वाढई यांचेवर गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावे अशी मागणी अरविंद दडमल यांनी केली.

या तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनासुद्धा सादर करण्यात आल्या आहेत. या तक्रारीवर पोलीस विभाग कोणती कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे. यासोबतच मानवाधिकार सहाय्यता संघटना चिमूर यांना अरविंद दडमल यांनी तक्रार दिली आहे.