माऊली लॅबोरेटिजचे प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते उदघाटन…

28

✒️अंबादस पवार(विशेष प्रतिनिधी)

संग्रामपूर(दि.5ऑगस्ट):-आज ५ ऑगस्ट गुरुवार रोजी संग्रामपुर येथील माऊली कॉम्प्युटराईज्ट क्लिनिकल लॅबोरेटिजचे उदघाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. अत्याधुनिक स्वरूपात सुरू झालेल्या लॅबोरेटरीमुळे आज येथील रूग्णांना तत्काळ व योग्य सेवा मिळणार आहे. एका शेतकऱ्यांच्या मुलाने या क्षेत्रातील पदवी प्राप्त करून संग्रामपूर सारख्या ग्रामीण भागात सुरू केलेल्या लॅबोरेटरीज ही बाब खरोखरच कौतुकास्पद पात्र असल्याची प्रतिक्रिया प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

सदर युनिट वैभव सुरेन्द्र भाकरे व नारायण पुरुषोत्तम गावंडे या युवकांनी संग्रामपूर स्टेट बँक समोर चोपडे निवासमध्ये सुरू केले. प्रशांत डिक्कर यांनी फित कापुन यांच्या हस्ते उदघाटन पार पडले याप्रसंगी. संग्रामपूर येथिल आसरा लॅबचे प्रशांत इंगळे सह गोकुळ गांवडे, धनंजय कोरडे, सोपान पाटील, संतोष मानकर, व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी गांवडे व भाकरे कुटुंबियांकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.