अतिदुर्गम डोंगराळ गोंदापुर गाव मुलभुत सुविधा पासून वंचित- लोकप्रतिनिधी व प्रशासनाने साधली चुप्पी

19

🔹गोंदापूर गावकरी म्हणतात, विकास व योजना म्हणजे काय?

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.6ऑगस्ट):- एकीकडे शासन गाव विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी निधी खर्च करित आहे तर दुसरीकडे माञ शासन प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावात शासकीय योजना पोहोचल्या नाहीत हि शोकांतीका आहे.नागरिकांना आजारप्रसंगी नाहक ञास सहन कराव लागत असल्याचा प्रकार बघायला मिळत आहे. जिवती तालुक्यातील तेलंगनाच्या पूर्वेकडील शेवटच्या टोकावरील हे गाव “गोंदापूर” ग्रामपंचायत भोक्सापूर अंतर्गत येणाऱ्या या गावची स्थापना 1990 ला झालेली असून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेती हा आपला परंपारिक व्यवसाय करून आपलं जीवन जगण्यासाठी गेल्या 30 वर्षापासून राहतं आहेत. 20 वस्तीच्या या गावाला शासन आज न उद्या येईल व आपल्याकडे लक्ष देईल व आपल्या गरजा व अपेक्षा पूर्ण करेल या आशेचे किरण घेऊन बसलेल्या या गावाकऱ्यांना गेले 30 वर्ष लोटूनही अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या या गावाचां गेल्या 30 वर्षापासून अपेक्षाचा भंग झाला आहे.

या गावात पांदण रस्ता सुद्धा नसल्याने.येण्या जाण्याची साधी सोय सुद्धा नाही.मानवाची मूलभूत गरज समजली जाणारी पिण्याच्या पाण्याची साधी सोय, वीज कनेक्शन,सुद्धा आजपर्यंत या गावापर्यंत नाही.उन्हाळ्यात ये-जा करण्यासाठी मोटारसायकल जाण्यायेण्यापूरता रस्ता गावकऱ्यांनी श्रमदान करून बनवलेला रस्ता हा सतत संत्ततधार अतिवृष्टी पावसाने पूर्णपणे खंदून वाहून गेल्याने आतातरी या गावाचा पूर्णच संपर्क तुटला असल्याने या गावात येण्याजाण्याची तुटकी फुटकी सोय सुद्धा नसल्याने महिलांची दिलिवरी सुद्धा या गावकऱ्याना आपल्या गावातच करावी लागते याचा नाहक त्रास त्यांना नेहमीचाच सहन करावा लागत आहे.ग्रामपंचायतीने तर या गावाला साधा पादंन रस्ता सुद्धा दिलेला नसल्याने नेहमीचच दुर्लक्ष केलेल्या या गावाला पंचायत समितीने सुद्धा कधी लक्ष दिलेल नाही.

तसेच शासनाने सुद्धा या गावाची कधी या गावाची दखल घेतलेली नाही.या गावात साधा पांदंन रस्ता नाही, विज कनेक्शन नाही, हातपंप नाही, अंगणवाडी केंद्र नाही,शाळा नाही,या डिजिटल जगातील मोबाईल ला कव्हरेज सुद्धा नाही.या गावाकडे नेहमीच शासनाच दुर्लक्ष केल्याने चित्र दिसत आहे.या अशा गावात आम्ही जगायचं तरी कस हा प्रश्न गावावंशीयांनी उपस्थित केला केला आहे. गावात आजपर्यंत कोणत्याही शाशकीय योजना पोहचलेल्या नाहीत.त्यामुळे मानवाचे जीवन जणू हे जंगली जनावरा सारखे जगावे लागत असल्याचे गावकरी बोलत आहेत.

——
स्थानिक नेते व प्रशासन यांनी लक्ष देऊन जिवती तालुक्यातील मोजा गोंदापुर येथील समस्या निकाली काढावे अन्यथा गोंदापूर गाववासीयांना घेऊन गोंडवाना गणतंत्र पार्टी आंदोलन करणार – अब्दुल जमीर अब्दुल हमीद प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक गोंडवाना गणतंत्र पार्टी