नुकसानग्रस्त शेतकरी व जनतेला तात्काळ मदत द्या- वंचित बहुजन आघाडीची मागणी

    32

    ✒️सिध्दार्थ ओ. दिवेकर(तालुका प्रतिनिधी उमरखेड)मो:-9823995466

    उमरखेड(दि.7ऑगस्ट):-दरवर्षीच्या तुलनेत पावसाळा सुरू होताच जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जवळपास 90 टक्के पाऊस झाल्यामुळे राज्यात सर्वत्रच अतिवृष्टी मुळे अनेक ठिकाणी महापूर आले कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्या बळी राजांनी शेतात पेरलेले अनेक पीक जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले कित्येक लोकांना बेघर व्हावे लागले त्यातच महापुरामुळे जवळपास 300 लोकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले.

    अशावेळी शासनाने केवळ तुटपुंजी मदत न करता शेतात एकरी होणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत सरसकट मदत देऊन पीडित कुटुंबियांचे व शेतकर्‍यांचे पुनर्वसन करावे. या उद्देशाने व कसानग्रस्त शेतकरी व जनतेला तात्काळ मदत द्याअशी मागणी वंचित बहुजन आघाडी ने उमरखेड सह संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांच्या, आणि पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांच्या आदेशान्वये व जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड व जिल्हा महासचिव डी.के.दामोधर यांच्या मार्गदर्शनानुसार मा.उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत शासनाला एकूण बारा मुद्द्याचे निवेदन देण्यात आले.

    यावेळी महासचिव प्रशांत विंनकरे, संतोष जोगदंडे तालुका अध्यक्ष उमरखेड, नगरसेवक संबोधी गायकवाड ,भारत कांबळे , मौलाना सय्यद हुसेन, राजू खंदारे, प्रा. गजानन दामोधर, उत्तम हारणे ,युवराज बंडगर, अथरोद्दीन खतीब, सुधाकर कदम, विष्णू वाडेकर ,अनिल जोगदंडे ,परमेश्वर जोगदंडे इत्यादीं कार्यकर्ते उपस्थित होते.