दुकाने निरीक्षक कार्यलय बंद!

31

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

बुलढाणा(दि.7ऑगस्ट):-जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला व ऊद्यौगासाठी जग प्रसिद्भ असलेला खामगाव शहरामध्ये प्रशासकिय ईमारतीत थाटलेले कार्यलय बंद असल्याने गाशा गुंडाळला का? या चर्चेला ऊत आला आहे.घाटाखालील तालुक्यासाठी खामगाव येथे दुकानाची नोंदणी रिन्हिव्हल प्रक्रिया,कामगार नोंदणी आदी विषय घेऊन सर्व सामान्य जनता या कार्यलयाला भेट देऊन सपुर्ण माहिती प्राप्त करते परंतु या कार्यलयामध्ये असलेले लिपीक अकोला चार्ज असल्याने फोन द्वारे सांगतात 

हा दुकाने अस्थापना विभाग बरेच दिवसापासुन बंद असल्याने कामगार वर्ग व व्यापारी वर्ग यांची दैना होत आहे.या कार्यलयाकरिता दुकाने निरीक्षक, एक लिपीक एक शिपाई अशी पदे आहेत.परंतु मिळालेल्या माहितीनुसार येथे असलेले लिपीक यांचे कडे अकोला कार्यलयाची अतिरीक्त जवाबदारी असल्याने येथे कार्यरत असलेले शिपाई श्री अशोक डोळस यांची जवाबदारी असतांना ते कधीच कार्यलयात आढळुन आल्याचे दिसले नाही अशी चर्चा या कार्यलयाला भेट देणार्या कडुन प्राप्त झाली आहे.

या कार्यलयाची जवाबदारी पाहता या ठिकाणी होत असलेला सावळा गोंधळ या कार्यलयाच्या अखत्यारिक्त असलेला कामगार मग तो धुणे भांडी करणारा कि मजुरी करणारा यासह व्यवसाईक दुकांनदार वार्यावर सोडल्याचे प्रत्यक्ष दिसुन येत आहे.याविभागामध्ये चाललेला गोंधळ होत असलेला तेरिभी चुप मेरी भी चुप करत दलालांच्या वा ईतरांच्या हातात गेला का हा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.