डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डातील बौद्ध स्मशानभूमीमध्ये वृक्षरोपण

22

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.7ऑगस्ट):- रोजी सकाळी 7 वाजता औदुंबर वृक्ष संवर्धन सेवा समिती व बौद्ध स्मशानभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील बौद्ध स्मशानभूमीमध्ये भदंत कीर्ती बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.बौद्ध स्मशानभूमी संवर्धन समिती वतीने औदुंबर वृक्ष संवर्धन सेवा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शब्द सुमणा ने स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे ज्येष्ठ सदस्य भारत कुलकर्णी सर, अध्यक्ष दिलीप भंडारे, कोषाध्यक्ष वैभव कोडगीरवार, सचिव प्रकाश शेळके, विजय रेघाटे, वीरेंद्र खंदारे, दीपक ठाकरे, विजय चौधरी बडेराव, तसेच बौद्ध स्मशानभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर, कोषाध्यक्ष भीमराव दिवेकर, डी डी. श्रवले, सदस्य तुषार पाईकराव, राजू धबाले, रत्नाकर दिवेकर, उत्तम गायकवाड, अजय दिवेकर, प्रविण इंगोल इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

एकच लक्ष जगतील कसे वृक्ष दिलीप भंडारे अध्यक्ष व सर्व सदस्य गण औदुंबर वृक्ष संवर्धन सेवा समिती उमरखेड