दुस-या दिवशीही ग्रामीण बॅंक बंदच – व्यवहारासह पिक कर्ज प्रकरणे खोळंबली

29

🔸व्यवस्थापक अर्धापुरे मारहान प्रकरण

✒️अतुल बडे(विशेष प्रतिनिधी)

सिरसाळा (दि.7ऑगस्ट):- सिरसाळा महाराष्ट्र ग्रामीण बॅंक चे व्यावस्थापक अशोक अर्धापुरे यांना मारहानी प्रकरणी बॅंक कर्मचा-यांनी दुस-या दिवशीही बॅंक बंद अंदोलन सुरु ठेवले आहे. या मुळे सामान्य लोक, व्यावसायिक, यांचे आर्थीक व्यावहारासहशेतक-यांचे पिक कर्ज प्रकरणे खोळंबली आहेत. दिनांक ३ रोजी पिक कर्ज प्रकरणी व्यावस्थापक जाचक अटी/ कागदपत्रे सांगत असल्याने दिड महिण्या पासुन परेशान शेतकरी रघुनाथ देशमुख यांनी चांगलेच चोपले होते. व्यावस्थापक यांनी ह्या प्रकरणी सिरसाळा पोलिस स्टेशन येथे शासकिय कामात अडथळा कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान व्यावस्थापक अर्धापुरे यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा ३५४ दाखल केला आहे.

हा गुन्हा खोटा असल्याचे बॅंक कर्मचारी यांचे म्हणने असुन हा खोटा गुन्हा माघे घेण्यात यावा तसेच मारहान करणा-तास तात्काळ अटक करावी अशी मागणी घेऊन बॅंक कर्मचारी बॅंक बंद अंदोलन करत आहेत.दुस-या दिवशी ही बॅंक बंद राहिल्यामुळे आर्थीक व्यावहारासह पिक कर्ज प्रकरणे खोळंबली आहेत. बॅंक बंद ठेवली असल्याने ग्राहक, खातेदार शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. बॅंक कर्मचारी यांनी जिल्हा अधिकारी, पोलिस अधिक्षक यांना निवेदन देखील दिल्याचे समजते आहे.

● गुरुवारी आर्थीक घडी बिघडली : सिरसाळा व परिसरातील खेडे गावा साठी गुरुवार हा खुप महत्त्वाचा वार आहे. ह्या दिवशी आठवडी बाजार भरत असल्याने मजुर, व्यावसायिक यांचे आर्थीक व्यावहार चालतात. पंरतु गुरुवारी बॅंक बंद राहिल्याने मुजर, व्यावसायिक यांची आर्थीक अडचण निर्माण झाल्याची परिस्थिती पहायला मिळाली.बॅंक तात्काळ सुरु करावी अशी मागणी नागरिकांत होत आहे.