बांभोरी बु। येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन….

30

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.7ऑगष्ट):-शनिवार रोजी तालुक्यातील बांभोरी बु येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.येथील माळी समाजाच्या विश्वस्तांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.संत शिरोमणी सावता महाराज यांनी आपल्या मळ्यात विठ्ठल रुपी काम पाहिले. त्यामुळे ते आपल्या अभंगांमध्ये म्हणतात.

कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी ॥ लसूण मिरची कोथंबरी । अवघा झाला माझा हरि ॥
स्वकर्म में हों रत । मोक्ष मिळे हातो हात ॥ सावत्या ने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥

अशाप्रकारे आपल्या अभंगातून समाजप्रबोधन करणाऱ्या , बहुजन समाजाला नवा आदर्श घालून दिला की कामातच देव आहे देव शोधायचाच असेल तर रंजल्या-गांजल्या मध्ये शोधा असे शाश्वत सत्य सांगणारे महान संत शिरोमणी सावता महाराजांना पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी समाजाचे ज्येष्ठ वरिष्ठ विश्वस्त व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

त्यात शिवाजी माळी ,श्रीराम जगताप, वासुदेव माळी, देवराम देशमुख ,अभिमन माळी, उमेश जगताप ,प्रमोद जगताप, मगन माळी, अनिल माळी, रवींद्र माळी, मेघराज देशमुख, भगवान माळी, अशोक माळी, हरी माळी इ.. समाजबांधव व महिलांनी उपस्थिती लावत संत सावता महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करत शासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करत महाप्रसादाचा लाभ घेतला.