महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी – गणेश चौकशे

    99

    ?वंचितच्या वतीने खामगावात उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

    ✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

    खामगाव(दि.7ऑगस्ट):-राज्यात झालेल्या महापुरामुळे ऊस व रब्बी आणि खरिप पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकरी तसेच नागतिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने खामगावात जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रात झालेल्या महापुरामुळे अनेक नागरिक व शेतकरी विस्थापित झाले आहेत.

    जुलै महिन्यात दोन दिवसांत साधारण १६०० मिमी पाऊस पडला. या पावसामुळे दरड कोसळणे, शेतजमीन खरडून गेली तसेच उभी पिके सुद्धा वाहून गेल्याचे विदारक चित्र दिसून आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील माती। वाहून गेली तर सद्यस्थितीत शेतात अक्षरशः दगड गोटे शिल्लक राहिले आहेत.तसेच पशुधन देखील मृतपाय झाले आहे.झालेल्या पावसामुळे शेतकरी व नागरिक यांचे तातडीने मदत व पुनर्वसन आवश्यक असल्याने त्यांना सर्वोतोपरी शासनाने मदत करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

    सदर निवेदनावर राज्य उपाध्यक्ष शरद वसतकार,जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे, नगरसेवक विजय वानखडे, संघपाल जाधव, गौतम सुरवाडे, मिलिंद हिवराळे,बाळू मोरे, संजय खंडेराव विकास हिवराळे,राजेश हेलोडे,संतोष धुरंधर, दादाराव हेलोडे,विक्रम नितनवरे,दगडू सरदार,नरेंद्र तायडे,नितीन सूर्यवंशी,भारत इंगळे, देवा निबाळकर,अमन हेलोडे,राजेंद्र राऊत ,यांच्या सह्या आहेत.