लोकनेते मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम – पै.माऊली पानसंबळ

    43

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.7ऑगस्ट):-पाटोदा,शिरुर का.विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर का.येथील महारथी कर्ण क्रीडा व व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते पै.माऊली पानसंबळ यांनी दि.०५ ऑगस्ट ते दि.१०ऑगस्ट या कालावधित पाच दिवसीय “साहेब महोत्सव” च्या माध्यमातून विविध सामाजीक उपक्रमाचे आयोजन केले आहे.

    लोकनेते मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत समाजोपयोगी उपक्रम राबवण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरुर कासार येथील महारथी कर्ण क्रिडा व व्यायामशाळेचे संस्थापक व भाजपाचे युवा नेते पै.माऊली पानसंबळ यांनी पाच दिवसीय साहेब महोत्सवाचे आयोजन केले आहे.या उपक्रमामध्ये कोरोना कालावधीत विशेष योगदान देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर,नर्सेस,वॉर्ड बॉय,शिक्षक,सफाई कामगार,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आदि विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव,शहरातील महिला सफाई कामगारांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात येणार आहे.त्याचबरोबर शेतकरी,शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष रोपे भेट,शाळा,महाविद्यालय परिसरासह सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.सेवाआश्रम येथील अनाथ निराधार बालकांना फळे व शालेय साहित्य वाटप,क्रीडा क्षेत्रातील होतकरु विद्यार्थी-खेळाडूंना खेळाचे साहित्य वाटप करण्यात येईल.

    लोकनेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी राज्यात विविध भागातील पुरग्रस्त,अतिवृष्टीने संकटात असलेल्या नागरिकांना मदत व्हावी व मतदारसंघात अनेक गावात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने दि.०५ ऑगस्ट रोजी वाढदिवसाला प्रत्यक्ष भेट टाळून हार,गुच्छ,फेटे,केक व इतर अनावश्यक खर्च टाळावा व त्याऐवजी समाजातील गोरेगरीब,गरजूंना मदत करून सामाजिक उपक्रम घ्यावेत असे आवाहन केले होते.त्यानुसार सामाजिक बांधिलकी व माणुसकी जोपासत शिरुर का.येथे भाजपाचे युवा नेते पै.माऊली पानसंबळ यांनी “साहेब महोत्सव” आयोजित केला आहे.मा.आ.भीमसेन धोंडे यांनी कोविडच्या संकट काळात आष्टी,पाटोदा,शिरूर का.या तीनही तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी खूप मोठी मदत करुन कोरोना रुग्णांना सलग तीन महिने दररोज “अन्नसेवा” देत भोजन व्यवस्था केली.

    लॉकडाऊन काळात देखील हातावर पोट असणाऱ्या हजारो गोरगरीब कुटुंबांना किराणा व अत्यावश्यक साहित्य देखील घरपोहच केले.आष्टी,पाटोदा,शिरुर कासार मतदारसंघातील जनसामान्यांच्या हृदयातील लोकनेते मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवसाच्या खास सामाजिक कार्यातुन शुभेच्छांचा वर्षाव करत युवा नेते पै.माऊली पानसंबळ यांनी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं व समाजासाठी सतत कार्यरत रहावं,समाजाचे आपण काही तरी देणे लागतो म्हणून निस्वार्थ भावनेतून शिरूर येथे साहेब महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम घेत असल्याचे सांगितले.दि.१०ऑगस्ट रोजी कोविड काळात विशेष कार्य करणारे वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर,नर्सेस,वॉर्ड बॉय,सामाजिक कार्यकर्ते,सफाई कामगार व पत्रकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा नगरपंचायत शिरुर का.येथे सकाळी ११ वा. सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

    यावेळी भाजपा पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार बांधव,युवक,शेतकरी बांधव व नागरिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे “साहेब महोत्सवाचे” आयोजक युवा नेते पै.माऊली पानसंबळ यांनी सांगितले.