आरोग्य सेवा सप्ताह:नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना चष्मे,औषधी, व ड्रॉप्सचे वितरण

    34

    ✒️अतुल बळे(परळी वैजनाथ, प्रतिनिधी)

    परळी(दि.7ऑगस्ट):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे नेत्ररोग तपासणी शिबिर झाले. या शिबीरातील नेत्र शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत.नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना चष्मे,औषधी, व ड्रॉप्सचे वितरण पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

    राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित आरोग्य सेवासप्ताह दरम्यान पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या नेत्र तपासणी शिबिरात नोंदणी झालेल्या रुग्णांवर परळी उपजिल्हारुग्णालय येथे मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. आज (दि.७) शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाना चष्मे,औषधी, व ड्रॉप्स वितरित करण्यात आले.

    यावेळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ.संभाजी मुंडे,नगर परिषद बांधकाम सभापती शंकर आडेपवार,शिक्षण सभापती गोपाळ आंधळे,शहर सरचिटणीस अनंत इंगळे,माजी नगरसेवक अझिजभाई कच्छी, रवि मुळे, समाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सावंत, युवक नेते भारत ताटे, प्रा. शाम सुंदर दासुद,शरद कावरे,शरद चव्हाण,जितेंद्र नव्हाडे,ज्ञानेश्वर मस्के,सय्यद अली यांच्यासह आरोग्यसेविका उपस्थित होते.आठवड्यातून दोन दिवस परळी व आंबेजोगाई येथे शस्त्रक्रिया संपन्न होणार आहेत शिबिरार्थी यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.