घाटनांदूरमध्ये  एकाच रात्रीत चार दुकाने चोरटय़ांनी फोडली

22

✒️राहुल कासारे(आंबाजोगाई प्रतिनिधी)मो:-9763463407

घाटनांदूर(ता.७ऑगस्ट):- अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर हे गाव मोठी बाजारपेठ असलेले एकमेव ठिकाण आहे. त्याच बरोबर अंबाजोगाई – अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग सुध्दा याच गावतुन गेला आहे.मुख्य रस्त्या लगतच्या मोठ्या कॉम्प्लेक्समधील एकाच रात्रीत तीन दुकाने अज्ञात चोरट्यानी फोडून रोख रक्कम लांबवली. मुख्य रस्त्यावरील दुकाने फोडल्याने व्यापारी,सर्व अचंबित झाले आहेत. ग्रामस्थामध्ये भीती निर्माण झाली असून पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थाकडून करण्यात आली आहे. 

कॉम्प्लेक्समध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यानी फोडून चोरी केल्याचे आढळून आले. शनिवारी पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान तोडून पवन ट्रेंडर्स, आरोही किराणा स्टोअर्स,  माही कलेक्शन, सुहाना इलेक्ट्रॉनिक अँड फर्निचर या चार दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यानी दुकानात प्रवेश करून  रोख रक्कम लांबवली. या दुकानाच्या शेजारी असलेले धीरज मोबाईल शॉपी चे मालक धीरज महाजन हे  दुकानात झोपले होते त्याच्या दुकानाचे शटर चोरटे उचकत असल्याने जाग आल्याने कॉम्प्लेक्सचे मालक व शेजारी दुकानदारांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून जागे केले.सर्वांनी दुकानात धाव घेतली. याच दरम्यान चोरट्यांनी पळ काढला.

तीन महिन्यापूर्वी येथून जवळच असलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरंबी येथे चोरट्यानी घरे फोडून रोख रक्कम व सोन्या चांदीचा दागिने लांबले तर दहा दिवसांपूर्वी साळुंकवाडी येथेही अशाच प्रकारे चोरट्यानी  घरफोड्या केल्या होत्या.  तर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटनांदूर शिवारातील शेतातील विद्युत ताराच्या चोरीच्या  चोऱ्यांचा तपास लागत नाही. तोवर काल रात्री पुन्हा एकदा चोरी व  दुकान फोडली, यामुळे गावातील नागरिक व व्यापारी यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज उशिरापर्यत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही. चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने चोऱ्यांची फिर्याद तरी कशाला द्यायची अशी भावना सामान्य नागरिकांत झाली असून, चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने दिवसेंदिवस दिवस  चोरांचे मनोध्यर्य वाढत आहे. चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत आहे. यांचे मूळ कारण गावातील वाढते जुगार अड्डे, अवैध दारूचे दुकाने असल्याचे, ग्रामस्थातून प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.