तुझ्यासाठी काही पण….प्रेमासाठी प्रेमी युगलांची आत्महत्या

    31

    ?आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर आढळला मृतदेह

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि.8ऑगस्ट):- ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचोली बुजुर्ग येथील अल्पवयीन युवक व युवतीचे प्रेत गडचिरोली जिल्हातील आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर दि ७ ऑगस्टला सायंकाळच्या दरम्यान आढळून आले . स्वाती दिलीप मेश्राम वय १५ वर्ष व आशिष प्रभू मेश्राम वय १७ वर्ष दोघेही रा.चिंचोली बुजुर्ग त.ब्रम्हपुरी येथील आहेत. दोघांनीही एकमेकाच्या हाताला दोर बांधून वैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केली . सदर आत्महत्या हि प्रेम प्रकरणातून केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

    स्वाती व दिलीप हे दोघेही ३ ऑगस्ट पासून बेपत्ता होते . दोघांच्याही कुटुंबीयांनी ब्रम्ह्पुरी पोलिस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. दोघांचीही शोध मोहीम ब्रम्हपुरी पोलिसांनी राबविली होती. दरम्यान आज दि ७ ऑगस्टला स्वाती व आशिष चा मृतदेह आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर एकमेकाच्या हाताला दोर बांधलेल्या अवस्थेत आढळून आला . पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोह्वा अरुण पिसे करीत आहेत.