गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयांनी नॅक द्वारे मूल्यांकन करणे आवश्यक आहे- डॉ. सी.एम. जाधव

26

🔸पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम संपन्न

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)

दारव्हा(दि.9ऑगस्ट):-आय. क्यू. ए. सी. मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा वतीने पाच दिवसीय वर्च्युअल फॅकल्टी डेवलोपमेंट प्रोग्रॅम ऑन नॅक रिवाईज असेसमेंट अँड अँक्रीडीटेशन फ्रेमवर्क या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३ ते ७ ऑगस्ट २०२१ दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उदघाटकीय कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानीं विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव सन्माननीय प्रोफेसर डॉ. एस. व्ही. घुईखेडकर मॅडम होत्या. सदर कार्यक्रम आय. क्यू. ए. सी. मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा, एच. आर. डी. सी. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ आणि फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

संत गाडगे बाबा आणि मुंगसाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजनानंतर विद्यापीठ गीताने या सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी नॅक चे प्रतिनिधी म्हणून डॉ. सी. एम. जाधव प्रिन्सिपल अँड प्रोफेसर माऊली ग्रुप ऑफ इंस्टीट्युशन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी शेगाव यांनी सुरुवातीला नॅक चे प्रतिनिधी म्हणून प्रमुख मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय कार्यक्रमा मध्ये डॉ. पियुष पहाडे हेड डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी एच. व्ही. देसाई कॉलेज पुणे आणि फ़ाउंडर मेम्बर ऑफ़ आय. क्यु. ए. सी. क्लस्टर ऑफ इंडिया यांनी नॅक करीता अतिशय महत्वपूर्ण असलेल्या डॉक्युमेंटेशन या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या उद्घाटकीय कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचालन आय. क्यु. ए. सी. चे कॉर्डिनेटर व भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. प्रशांत बागेश्वर यांनी केले तर पहिल्या दिवसाचे आभार प्रदर्शन डॉ. नाझीया रशीदी, हेड डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री यांनी केले.
दुसऱ्या दिवशी दि. ४ ऑगस्ट २१ ला नॅक चा पहिला क्रिटेरिया करीकुलर अस्पेक्टस यावर प्रा. डॉ. पराग शहा आय. क्यु. ए. सी. कॉर्डिनेटर मॉडर्न कॉलेज पुणे आणि नॅक चा दुसरा क्रिटेरिया टिचिंग लरनिंग अँड ईव्हयाल्युएशन यावर प्रोफेसर डॉ. पी. एम. अर्धापुरकर माऊली ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी शेगाव यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचं संचलन कु. नेहा माहुरकर असिस्टंट प्रा. डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री तर आभार प्रदर्शन प्रा. प्रियांका रुईकर मॅडम यांनी केले.

तिसऱ्या दिवशी दि. ६ ऑगस्टला क्रायटेरिया-३ रिसर्च इंनोवेशन अँड एक्सटेन्शन यावर डॉ. हेमंत चांडक, कॉर्डिनेटर जी. एस. कॉलेज खामगाव आणि क्रायटेरिया-४ इन्फ्रास्ट्रक्चर अँड लरनिंग रिसोर्सेस यावर डॉ. भारत कानगुडे अनंतराव पवार कॉलेज पिरंगुट पुणे यांनी उत्कृष्ट आणि सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचं संचलन प्रा. रुईकर मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन स्नेहा माहुरकर मॅडम यांनी केले चौथ्या दिवशी ६ ऑगस्ट २०२१ ला क्रायटेरिया-५ स्टुडन्ट सपोर्ट अँड प्रोग्रेशन या विषयावर डॉ. अयुब शेख आय.सी. एस. कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स खेड, पुणे तर क्रायटेरिया-६ गव्हर्नन्स, लीडरशिप अँड मॅनेजमेंट या विषयावर डॉ. दीपक ननावरे वेलणकर कॉलेज सोलापूर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा संचलन डॉ. अख्तरउन्नीसा कुरेशी तर आभार प्रदर्शन प्रा. सुनील डंभारे यांनी यशस्वीपणे केले. शेवटच्या दिवशी ७ आगस्ट ला क्रायटेरिया-७ इंस्टिट्यूशनल व्हॅल्यूज अँड बेस्ट प्रॅक्टिसेस या विषयावरती डॉ. गौरी देवस्थळे अबेदा इनामदार कॉलेज पुणे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

समारोपीय कार्यक्रमांमध्ये डॉ. एन. एस. ठाकरे प्राचार्य मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय मानोरा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंगसाजी महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य राऊत सर होते. या कार्यक्रमामध्ये भारतातील विविध राज्यातील जवळपास १५० प्राध्यापक मान्यवर पाहुणे मंडळी हजर होती. कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे आयोजन संदर्भात काही मान्यवर प्राध्यापकांची प्रतिक्रिया घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचं उत्कृष्ट संचलन प्रा. डॉ. नाझींया राशिदी तर आभार प्रदर्शन प्रा. रवी बोरकर यांनी यशस्वीरित्या केले. या पाच दिवसीय राष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलप मेंट प्रोग्रामच्या यशस्वीतेसाठी प्रोफेसर डॉ. प्रशांत बागेश्वर यांनी अथक परिश्रम घेतले. ऑर्गनायझेशन कमिटीचे सदस्य म्हणून प्रा. डॉ. अमोल वाकोडे प्रा. नाझींया राशिदी, प्रा. सुनील डंभारे प्रा. भागवत सर व प्रा. नाशीत खान यांनी महत्त्वपूर्ण योगदान केले. कार्यक्रमाच्या यशवितेसाठी उपप्राचार्य प्रोफेसर सुनील चकवे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.