चिमूर मध्ये हुतात्मा क्रांतीवीरांना क्रांतिदिन निमित्ताने पुष्पचक्र अर्पण करून वाहिलि आदरांजली

36

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.9ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ९ आगस्ट १९४२ ला इंग्रजांना भारत छोडो चा नारा देत चले जाव आंदोलन पुकारले होते तेव्हा दरम्यान अनेक क्रांतीवीरांनी प्राणाची बाजी लावून आहुती दिली . शहीद वीरांना नमन करण्यासाठी कांग्रेस चे नेते *धनराजभाऊ मुंगले* यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली

यावेळी कांग्रेस चे जेष्ठ नेते भीमरावजी ठावरी, माजी जीप सदस्य विलास डांगे, सुधीर पोहनकर, माजी जीप सदस्य तुळशीराम बनसोड, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप कावरे सुधीर पंदिलवार, कमलेश बांबोडे, शंकर माहुरे ,रमेश दडमल, माजी सरपंच यशवंत दडमल, राजू ननावरे, रत्नाकर विठाले, प्रदीप तळवेकर, किशोर नवले, विनोद सातपुते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान अभ्यंकर मैदानावरील शहीद बालाजी रायपूरकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले थोर पुरुषांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली .