गंगाखेड नगर परिषद कार्यालयातच गटारी साजरी

18

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10ऑगस्ट):-नगर परिषद गंगाखेड येथील चक्क नगर परिषद कार्यालयातच गटारी साजरी केल्याचा प्रकार ऊघडकीस आला आहे. या पार्टीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून अनेक जण स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात बिर्याणीवर ताव मारताना दिसत आहेत. या घटनेची चर्चा गंगाखेड शहरात जनता करत असल्याची माहिती आहे.

तसेच रविवार दिनांक 08ऑगस्ट रोजी दर्श आमावस्या आल्यामुळे सोमवार पासून श्रावण महिना सुरू होत असल्याने आमावस्येला गटारी आमावस्या म्हणुनही ओळखले जाते रविवारी लॉकडाऊन असतानाही ढाबे आणि मांसाहारी जेवनासाठी प्रसिद्ध असलेले ढाबे हाऊसफुल्ल होते कि काय म्हणून गंगाखेड नगर परिषदेतील कथित लोकप्रतिनिधी ने मात्र गटारी साजरी करण्यासाठी कोणतेही हॉटेल अथवा ढाब्याऐवजी चक्क नगर परिषद कार्यालयच निवडले.

आणि सायंकाळी न. प. च्या मुख्य सभागृहात बिर्याणीचे पार्टी सुरु असल्याची दिसते . ज्या सभागृहात नगर परीषदेच्या सर्वसाधारण सभा होतात त्या स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात बिर्याणीची पंगत सुरू झालेली दिसते. चक्क नगर परिषद कार्यालयातच गटारी साजरी केल्याचा संतापजनक प्रकार ऊघडकीस आला आहे. या पार्टीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून अनेक जण स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात बिर्याणीवर ताव मारताना दिसत असून या घटनेची चर्चा शहरात चर्चा विषय बनला आहे.