मानवाधिकार सहाय्यता संस्थान शाखा चिमुरचा पदग्रहण सोहळा संपन्न

    36

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.10ऑगस्ट):-मानवाधिकार सहाय्यता संस्थान र. न. २५७ शाखा चिमूर आय एस ओ ९००१ : २०१५ चिमूर येथे अपना सांस्कृतिक भवनात प्रदेश महासचिव रवी धारणे चंद्रपूर, जिल्हा प्रमुख विनायक गरमडे, जिल्हा प्रभारी अशोक गर्गेलवार, शैलेश खडेलवार यांच्या उपस्थितीत मानवाधिकार मार्गदर्शन चर्चा व परिचय मेळावा स्वागत-सत्कारासह संपन्न झाला.

    कार्यक्रमात तालुका प्रमुख डॉ. संजय पिठाळे, तालुकाध्यक्ष ग्रंथमित्र समाजसेवक सुभाष शेषकर, तालुका संरक्षक अँड. मधुकर लांबट, तालुका प्रभारी माजी प्राचार्य सुधीर पोहनकर, तालुका चेयरमन अमोद गौरकर, तालुका कार्यकारी अध्यक्ष केशवराव वरखेडे, तालुका उपाध्यक्ष डॉ. चंद्रभान खंगार, तालुका महासचिव रंगनाथ बांगडे, सचिव प्रा. हेमंत वरघने, तालुका महामंत्री भिमराव ठावरी, तालुका मंत्री अफरोज रुस्तमखाँ पठाण, तालुका संघटन मंत्री रमेश भोयर, तालुका उपसंघटन मंत्री मनीष नंदेश्वर, तालुका प्रचारमंत्री डॉ. महेश खानेकर, किशोर भोयर, तालुका संयोजक विनोद उमरे, तालुका मिडिया प्रभारी रामदास ठुसे, तालुका जाँच मंत्री प्रा. संजय साखरकर, तालुका कोषाध्यक्ष गजानन कारमोरे, सदस्य डॉ. सुरेश मिलमिले, केमदेव वाडगुरे, पवन बंडे, सुमित भिडेकर, किर्ती रोकडे, मिलिंद जांभुळे, विनायक महाकुलकर, अशोक आवळे, नरेश उमरे, विशाल खांडेकर आदी तर महिला प्रकोष पदातून महिला तालुका प्रमुख नीता लांडगे, तालुकाध्यक्ष वैशाली शेंडे, महासचिव हर्षा बोथले, उपाध्यक्ष दुर्गा सातपुते, तालुका योजना मंत्री इंजिनीअर रुचिका शेषकर, तालुका संयोजक माधुरी आवारी, तालुका संघटन मंत्री मंगला वेदी, सदस्य सुचिता भोयर, वंदना शेषकर आदींच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला.

    कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष सुभाष शेषकर यांनी केले तर आभार डॉ. संजय पिठाले यांनी मानले. मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.