दिव्यांगांना भविष्यात यु.डी.आय.डी.कार्ड बंधनकारक होणार – राजेंद्र लाड

23

दिव्यांगांनी यु.डी.आय.डी.कार्ड (स्वावलंबन कार्ड) काढण्यासाठी महत्त्वाची माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बंधू – भगिनींनी UDID card व Online certificate साठी www.swavlambancard.gov.in या website वर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.अशी माहिती शासनमान्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिव्यांग हितार्थ कळविली आहे.

हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी असून रजिस्ट्रेशन करतांना फोटो(15 ते 30 kb),सही (3 ते 15 kb),address proof (100 kb च्या आत), identity proof ( 100 kb च्या आत),दिव्यांग प्रमाणपत्र (100 kb च्या आत) इत्यादी कागदपत्रे upload करावी लागतात तर सोबत माहिती आवश्यक 1) जन्मतारीख 2)मोबाईल नंबर,3) email I’d,4)आईचे नाव ,5) पती/पत्नीचे नाव,6) पत्ता,7) रक्तगट (माहित असेल तरच टाका),8)दिव्यांगत्वाचा प्रकार व टक्केवारी,9)दिव्यांग प्रमाणपत्र नंबर,10)दिव्यांगत्व नेमके कशाचे आहे( हात,पाय,कान,डोळे किंवा इतर काय असेल ते,11) उत्पन्न,12) आधार नंबर,13) जातसंवर्ग इत्यादी.

वरीलप्रमाणे सविस्तर माहिती भरून,कागदपत्रे upload करून form submit करावा व प्रिंट काढावी.तद्नंतर ती प्रिंट व upload केलेली कागदपत्रे,रेशनकार्ड,एक पासपोर्ट फोटी इ.ची एक प्रत घेवून तुमच्या जिल्ह्याच्या सिव्हिल हाॅस्पीटल ला (जिल्हास्तरीय सरकारी दवाखाना) तपासणीसाठी बुधवारी सकाळी ८ वाजता उपस्थित रहावेच लागते.कंपलसरी तपासणी होतेच.मग तुमचे कोणतेही सर्टिफिकेट असो ( Online,SADM,त्रिस्तरीय,मेडिकल बोर्ड,सिव्हिल सर्जन)सिव्हिल हाॅस्पीटल ला submit केले की,साधारणत वीस ते पंचवीस दिवसांनी Online चेक करणे किंवा तुम्हांला मेसेज ही येतो.(सर्वानाच मेसेज येतील की नाही सांगता येणार नाही)त्याठिकाणी UDID card व सर्टिफिकेट असते ते download करून कलर प्रिंट मारून घेणे.UDID Card साधारणत: पाच ते सहा महिन्यात पोस्टाने घरपोच येते किंवा तुमच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयातून मिळते.(online status check karave) जर UDID कार्ड मिळाले नाही तर जेथे माहिती भरली भरली तेथे संपर्क साधणे.

(कर्णबधिर,मूकबधिर यांना शक्यतो मशिन व सोय उपलब्ध नसल्यास दुसरीकडे तपासणीसाठी पाठवतात.)याबाबत दुसरीकडे तपासणीसाठी जाण्यासाठी तसे आपल्याला सिव्हिल हाँस्पिटल मधून संबधिताची तपासणी करून मिळावी असे पत्र दिले जाते.तरी ज्या दिव्यांग बांधवांनी यु.डी.आय.डी.प्रमाणपत्र अद्यापही काढले नसेल ते तात्काळ काढून घ्यावे कारण भविष्यात सर्व शासकीय योजना या कार्ड वरच अवलंबून असणार आहेत असेही शेवटी राजेंद्र लाड यांनी सांगितले आहे.