गायरान हक्क अभियानाच्या वतीने अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयात निवेदन सादर

29

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई,तालुका प्रतिनिधी)मो:-9763463407

अंबाजोगाई(दि.10ऑगस्ट):-दि.९. रोजी अंबाजोगाई तालुक्यातील गायरान जमीनीवर, कसेल त्याची जमीन या हक्काची आरोळी अँड. विलास लोखंडे संस्थापकअध्यक्ष गायरान हक्क अभियान यांनी सबंध महाराष्ट्रात दीली आहे. अनेक संघर्षाच्या भुमिका बिड जिल्हात गायरान हक्क अभियानांतर्गत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.आज पुन्हा एकदा गायराणधारकांच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या कडे लक्षवेधी निवेदन सादर करण्यात आले. आपल्या विविध मागण्या पैकी, ई ला नोंद घेण्यात यावी,पेरणी पीक पंचनामे करण्यात यावेत.

गायराणधारकांच्या वाटप करण्यात आलेल्या सात बारा वरील पोट खराब नोंद काढण्यात यावी,व वाहिती मध्ये घेण्यात यावी जेणेकरून शासकीय योजना मिळतील,अश्या व इतर मागण्या मंजूर करण्यात याव्यात म्हणून व दिनांक 15/08/2021 रोजी होणाऱ्या गायराणधारकांच्या वतीने अर्धनग्न मोर्च्या आणि दिनांक 14/08/2021 रोजी बनसारवळा येथील गायरानधारकांचे आमरण उपोषण संदर्भात निवेदन देण्यात आले.

या वेळेस गायरान हक्क अभियानाचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर जोगदंड,गायरान हक्क अभियानाचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख तथा वंचित ब आघाडी अंबाजोगाई तालुका प्रवक्ते गोविंद मस्के,वंचित तालुका महासचिव उमेश शिंदे,बनसारवळा येथील गायरानधारक गायकवाड ताई,बनसोडे ताई,व इतर महिला उपस्थित होत्या.