ग्रामरोजगार सेवकांचे गेवराई तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    38

    ✒️विशेष गेवराई(नवनाथ आडे)

    गेवराई(दि.10ऑगस्ट):-तालुक्यातील एमआयएसवरील अतिरिक्त ग्रामरोजगरा सेवक कमी करून ग्रामपंचायत नांदलगाव येथील अपंग ग्रामरोजगार सेवकास न्याय मिळवून द्यावा.तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकर्‍यांच्या मोहगमी प्रस्तावास तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन वर्कऑर्डर द्यावे. यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार संघटनेने विविध मागण्यांसाठी गेवराई तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

    गेवराई तालुक्यातील काही ग्रामपंचायत अंतर्गत व राजकीय लोकांनी ग्रामरोजगार सेवकांना विचारात घेतले नाही.तसेच शासन निर्णयाचा कुठलाही संदर्भ न घेता अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकांची बोगस निवड करून बोगस कामे केली आहेत. या सर्व प्रकाराला संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक जबाबदार आहेत.