बीड जिल्हा हा जातीय अत्याचाराच जिल्हा आहे – अनिल डोंगरे

38

🔸बीड जिल्ह्यातील महिलांवरील जातीय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई,तालुका प्रतिनिधी)मो:-9763463407

अंबाजोगाई(दि.10ऑगस्ट):-वंचित बहुजन आघाडीचे नेते जिल्हा अध्यक्ष अनिल डोंगरे यांनी बीड मध्ये मुस्लिम महिला व बहुजन महिलांवरील वाढत असलेला अन्याय अत्याचार विरोधी भूमिका मांडत असताना मत व्यक्त केले. मुस्लिम नेते खाजामिया पठाण यांनी माजलगाव तालुक्यातील सुरडी व पाटोदा येथील चुंबळी या ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाच्या मुलींवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला.

या प्रकरणी तपास यंत्रणा वाढवून, अशा निंदनीय घटना पुन्हा घडू नयेत म्हणून खबरदारी घ्यावी व न्याय द्यावा असे निवेदन आज अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सादर करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या महीला खासदार असुनही महिलांवरील अत्याचार थांबता थांबत नाहीत. व पालकमंत्री असो की खासदार यांनी पिडीताच्या कुटुंबातील सदस्य यांना साधा भेटायला वेळ नाही.

याची दखल सुध्दा घेऊ शकत नाहीत ही निंदनीय बाब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीड मध्ये महीला अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. यावर प्रशासनाने जातीने लक्ष घालून महीला अत्याचार थांबले पाहिजेत असे ही अनिल डोंगरे म्हणाले. हे निवेदन देण्यासाठी महासचिव मिलिंद घाडगे, गफार खान, रानबा उजगरे, गोविंद मस्के, अमोल हातागळे, सुशांत धावरे, डॉ. नंदकिशोर सोमवंशी, नवनाथ पौळ व अनेक मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.