रक्तदान करुन चिमुरचे राजू शर्मानी दिले जीवदान!

22

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10ऑगस्ट):-सामाजिक कामात सदैव तप्तर असणारे चिमूर युवक राजू शर्मा यांनी रक्तदान करून एकाचा जीव वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुकासह अभिनंदन होत आहे.माणुसकी म्हणजे काय याचा जिवंत उदाहरण आज(10 ऑगस्ट) राजू भाऊ शर्मा आणि विदर्भ ब्लड सेवा ग्रुप चे कॉर्डीनेटर सागर दादा इलकर यांनी प्रत्यक्षात घडवून आणला.दिनांक 10 ऑगस्टला A negative या दुर्मिळ रक्तगटाचि गरज भासली, असता राजू भाऊ शर्मा यांनी आपले प्रतिष्ठान ( दुकान ) बंद ठेऊन चिमूर ते ब्रम्हपुरी असा 70 किलोमीटर चा अंतर पार करून रुग्णाला नवीन जीवनदान दिले.

राजु भाऊ शर्मा यांचा हा 13व्या वेळ रक्तदान होता , या मध्ये सागर दादा इलकर यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली, सागर दादांनी स्वतःच्या गाडीने, स्व खर्चाने, चिमूर ते ब्रम्हपुरी राजू भाऊ शर्मा यांना घेऊन आले. नेहमीच जनसेवेसाठी आणि रुग्णसेवेसाठी तत्पर असणारे सागर दादा इलकर आणि राजू भाऊ शर्मा यांचे आभार मानतानी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईक यांचे डोळे पाणावले.जनसेवेसाठी विदर्भ ब्लड सेवा ग्रुप ब्रम्हपुरी आणि नागपूर ग्रुप नेहमी च सहकार्य करते. रक्तदान करताना विदर्भ ब्लड सेवेचे कार्डिनेटर उपस्थित होते.