प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी धनंजय कुलकर्णी यांची निवड

21

✒️बीड विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.17ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा ना.बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक संतोष राजगुरू यांनी धनंजय कुलकर्णी यांची प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक संतोष राजगुरू यांनी बीड जिल्ह्यातील सुप्रसिध्द अभ्यासू व धडाडीचे शिक्षक नेतृत्व धनंजय देवीदासराव कुलकर्णी यांची संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निवड केली आहे.

या प्रसंगी संघटनेचे राज्याचे प्रवक्ता दत्तात्रय पुरी,मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष पांडुरंग उनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.नवजीवन पतसंस्थेचे संचालक,महाराष्ट्र इंग्लीश टिचर्स असोशिनचे जिल्हा सचिव,समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष,अखिल भारतीय ब्राह्मण कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशा विविध पदावर कामाचा प्रदिर्घ अनुभव असणारे व शिक्षण क्षेत्रातही विविध पुरस्कारांनी सन्मानित शिक्षक धनंजय कुलकर्णी यांची प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिक्षण,क्रीडा व समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तथा नवजीवन पतसंस्थेचे श्रीरामअण्णा बहीर,प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान पवार,महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर,कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब हांगे,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप डावकर,शिक्षक भरतीचे सरचिटणीस विठ्ठल फुलझळके,शिक्षक सेनेचे जिल्हा संघटक राहुल सुपेकर,अल्पसंख्यांक संघटनेचे शेख मुसा,मुमताज हाश्मी,बालासाहेब वाघुले,संजय वाघुले,अ.भा.प्रा.शि.संघाचे सुशील जोगदंड,केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष रामदास ठोसर,मुख्याध्यापक शेख मेहेरबाजी,भांगे सर,पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आनंद पिंगळे,नवजीवन पतसंस्थेचे माजी तथा संघाचे नेते निवृत्तीराव डाके,गावडे,भूषण टेके,म्हासकर,बादाडे,भवर,गव्हाणे बी.एन.,श्रीराम काशीद,सातपुते,विठ्ठल कराड इत्यादींनी धनंजय कुलकर्णी यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.