भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून महामानव जीवन संदेश अभियान अंतर्गत ऑनलाईन जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा,वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

    38

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

    म्हसवड(दि.17ऑगस्ट):-भारतीय विद्यार्थी मोर्चा हे एक सामाजिक आणि गैरराजनितिक संघटन असुन शोषित, पिढित, गरीब विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई लढत असतांना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे काम मागील दहा वर्षांपासून करीत आहे अशाच प्रकारे कडक लाॅकडाऊन असताना देखील न थांबता महापुरुषांची चळवळीची विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय विध्यार्थी मोर्चा च्या वतीने ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

    या स्पर्धेच्या माध्यमातून समाजामध्ये महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि जीवन कार्याचा संघर्षाची विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा जिल्हा युनिट च्या वतीने महामानव जीवन संदेश अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 29 एप्रिल 2021 रोजी जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा गुगल फाॅर्म माध्यमातून घेण्यात आली होती त्या स्पर्धेत जवळ 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ही प्रश्र्नमंजुषा स्पर्धा महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित होती आणि व 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

    या मध्ये 65 विद्यार्थी सहभागी झाले होते व त्यामध्ये 11 विजेत्या विद्यार्थ्यांचे नंबर काढण्यात आले या स्पर्धेचे विषय महापुरुषांच्या जीवन संघर्ष यावर आधारित होते वकृत्व स्पर्धेत लहान गटात कु. साक्षी अंकुश भिसे – प्रथम क्रमांक,कु. सानिया उमेश भोसले- व्दितीय क्रमांक,कु. साक्षी विश्वनाथ पवार- तृतीय क्रमांक,.(मोठा गट)कु. गायत्री सुतार – प्रथम क्रमांक उत्तेजनार्थ – गौरव लोकरे,सुमेधा सरवदे,ज्ञानेश्वरी धडांबे, इ. सर्वांनी यश मिळवले यशस्वी सहभागी स्पर्धकांचे यावेळीअभिनंदन करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन अमर कांबळे सर जिल्हा प्रभारी भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा यांच्या दिशा निर्देशानुसार आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे संयोजक मा.चेतन आवडे (जिल्हाध्यक्ष सातारा), मा.किशोर खरात (जिल्हा उपाध्यक्ष) सातारा, मा.प्रथमेश ठोंबरे ( राज्य प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश) व बाकीच्या ऑफशुट विंग मधील सहकारी, तुषार मोतलिंग सर, शुभम भंडारे, संकेत यादव,अस्मिता कांबळे, आकांक्षा जगदाळे, अक्षदा आवडे, प्राची कांबळे, सायली आवडे,या सर्वांच्या अथक परिश्रम आणि सहकार्य यामुळे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

    यावेळी या स्पर्धांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना सर्टिफिकेट, ट्राफि , महापुरुषांची पुस्तके भेट देण्यात आली आभार व सर्व सहभागी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.चेतन आवडे,जिल्हाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा यांनी विध्यार्थ्याचा बौद्धधिक विकास होण्यासाठी अशा स्पर्धाचे आयोजन भारतीय विध्यार्थी मोर्चा नेहमी करीत राहील असे पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.