स्व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथअभियान अंतर्गत कन्हाळगाव येथे बुथ बैठक संपन्न

20

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.18ऑगस्ट):- भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कन्हाळगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये बूथ प्रमुख,बुथ समिती,बुथ पेज प्रमुख,यादीचे वाचन,शक्ती केंद्रप्रमुख तसेच इतर विषयावर चर्चा करून समिती गठित करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे श्री रामदासजी कौवरासे,श्री दिवाकरजी मालेकर, श्री पद्माकर गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते या बैठकीमध्ये बुथ प्रमुख म्हणून श्री राजू लटारी येरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

तसेच तिस सदस्यांची समिती गठित करण्यात आली तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात बुथ प्रमुख हा समितीचा मुख्य असतो व इतर सदस्य सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात सर्वांनी एक जुटीने मिळून काम करावे व आपल्या बुथवर चांगल्याप्रकारे लिड भेटेल या उद्देशाने काम करावे पक्ष सर्वांना संधी देत असते तरी सर्वांनी पक्षासाठी एकमताने झटावे असे बोलून दाखवले बैठकीला मोलाचे सहकार्य प्रवीण भोयर,दिवाकर गेडाम,विनोद भालेकर, सुधाकर कव्वलवार, रामदास येरेकर आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन पद्माकर गेडाम यांनी केले तर आभार पिंटू गेडाम यांनी मानले