सातवा वेतन आयोगाचे मागणीसाठी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

24

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१८ऑगस्ट):-स्थानिक नगरपालिकेच्या सफाई कामगारांनी सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्याकरिता आज पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.आज दुपारी पालिका प्रशासनाचेवतीने मुख्याधिकारी अनिल जगताप यांचेशी या संबंधी चर्चा झाली,परंतु प्रस्तुत चर्चा निष्फळ ठरल्याने आता सफाई कर्मचारी संप सुरुच राहणार आहे.नगरपालिका कर्मचारी संघटनेने नगरपालिका प्रशासनासोबत कैलेल्या कराराचा सफाई कर्मचारी संघटनेने विरोध केला असून त्यांनी घेतलेला निर्णय मान्य नसल्याचेही सफाई कामगारांनी विरोधी भूमिका घेतली आहे.

आज सकाळी ०७ वाजता सफाई कामगारांनी मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या समस्या मांडल्या. यावर तोडगा न निघाल्यास आजपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी मुख्याधिकारी अनिल जगताप यांचाशी झालेल्या भेटीत या मागण्या संदर्भात दुपारी ३ वाजता चर्चा करण्यास या सफाई कामगारांना आमंत्रित करण्यात आले.

या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात मुख्याधिकारी जगताप यांना विचारणा केली असता सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान मिळाले नाही,पालिकेलाच आपल्या फंडातुन सातवा वेतन आयोग लागू करायचा असून कोरोनाकाळात पालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे,येत्या दिवाळीपर्यंत आर्थिक परिस्थितित सुधारना झाल्यास कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करू अशी माहिती दिली,सफाई कामगारांच्या थकित वेतनाविषयी विचारणा केली असता पालिकेच्यावतीने सफाई कामगारांना संपूर्ण वेतन दिले असून कोणतेही वेतन थकित नसल्याची माहिती त्यांनी प्रतिनिधीला दिली.