वहिती केलेल्या जमिनिवरील उभ्या पिकांवर तथाकथित गावगुंडांनी केली तन नाशकाची फवारणी

    34

    ?तरीही प्रशासन घेतय बघ्याची भूमिका

    ?सदरील प्रकरणातील लोकांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी लाडेगांव येथील गायरान धारकांचे आज पासून बेमुदत आमरण उपोषण

    ✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो-8080942185

    बीड(दि.18ऑगस्ट):-आज उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबेजोगाई येथे गायराण हक्क अभियान च्या वतीने केज तालुक्यातील मौजे लाडेगाव येथील मागास वर्गीय गायरान धारक त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय मिळावा म्हणून बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. गायरानधारकांच्या या उपोषण मध्ये खालील मागण्या आहेत.

    १)मौजे लाडेगाव येथील सरकारी जमीन गट नं १४३ मधील अतिक्रमण धारकांच्या वहिती केलेल्या उभ्या पिकांवर तननाशक फवारनाऱ्या समाज कंटाक विरूद्ध अट्रोसिटी ॲक्ट कायदा अंतर्गत गुन्हे नोंद करावेत.२) जमीन गट नं १४३ मधील तणनाशक फवारून केलेल्या पिकाची नुकसान भरपाई समाज कल्याण विभाग मार्फत तात्काळ देण्यात यावी.३) अट्रोसिटीला काऊंटर करण्यासाठी म्हणून खोटा दरोड्याचा गुन्हा दाखल करनाऱ्या फिर्यादी व फौजदार यांच्या विरुद्ध अट्रोसीटी ॲक्ट ३(१)(पी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. व दाखल करण्यात आलेल्या खोटा दरोड्याचा गुन्हा मागे घेण्यात यावा.४) गु.र.न १२३/२०२१ येथील पो. स्टे युसुफ वडगाव येथील पूर्ण प्रकरणाचा तपास व्हिडिओ रेकर्डिंग अंतर्गत करण्यात यावा.

    ५) जमीन गट नं १४३ मधील अतिक्रमण धारकांना गायराना मध्ये पोलीस संरक्षण देण्यात यावे. तसेच गु र न १२३/२०२१ प्रकरणाचा तपास ३० दिवसात पूर्ण करून विशेष न्यायलायाकडे तपास अहवाल सादर करावा.६) मौजे लाडेगाव है जातीयवादी संवेदनशील गाव म्हणुन घोषीत करून शासनाच्या योजना व निधी बंद करावा.७) जमीन गट नं १४३ मधील अतिक्रमण धारकाना त्या गावातील गुंडांना पायबंद घालण्यासाठी गु र नं १२३/२०२१ प्रकरणात विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी.८) जमीन गट नं १४३ मधील पिकांचे नुकसान करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात.९) जमीन गट नं १४३ मधील अतिक्रमण धरकांचे अतिक्रमण तात्काळ नियमानुकुल करण्यात यावेत. व त्यांना ७/१२ बहाल करून शासनाच्या विविध योजना देण्यात याव्यात.

    या उपोषणाला लाडेगाव येथील गायरान धारक मोहन धीरे, परसराम धीरे, विजयमाला नवगिरे, मधुकर नवगिरे, बालू धीरे, भिवा धीरे, काविरा धीरे, वचिष्ट धीरे व इतर १३ गायरान धारक महिला आणि पुरुष व बालक उपोषणाला बसले आहेत. तसेच या ठीकणी गायरान हक्क अभियान चे संस्थापक अध्यक्ष ॲड विलास लोखंडे, राष्ट्रीय सचिव बन्सी भाऊ गायसमुद्रे, वंचित ब आघाडी अंबाजोगाईचे प्रवक्ते गोविंद मस्के, वंचित चे तालुका अंबेजोगाई चे महासचिव उमेश शिंदे हे उपस्थित होते.