हंबर्डे महाविद्यालयात राज्यस्तरीय  ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

    51

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.18ऑगस्ट):-गेली सात वर्षापासून घेण्यात येत असलेल्या आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालय आष्टी,जि.बीड येथे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.प्रारंभी  संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या हस्ते भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तद्नंतर दीप प्रज्वलनाने वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळी उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे,सचिव अतुल सेठ मेहेर उपस्थित होते.

    यंदाचा ॲड.बी.डी.हंबर्डे समाजभिमुख उत्कृष्ट प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्कार पिंपळगाव ता.निफाड,जि.नाशिक चे प्रा.डॉ.ज्ञानोबा त्रिंबक ढगे यांना घोषित झाला.तसेच भाऊ फाऊंडेशन आणि हंबर्डे महाविद्यालयाच्या वतीने कवी,गीतकार प्रा.डॉ.दासू वैद्य यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्काराबद्दल अभिनंदन करण्यात आले.प्रा.डॉ.ज्ञानोबा त्रिंबक ढगे यांचे ऑनलाइन मार्गदर्शन लाभले.वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.यात श्रुती अशोक बोरस्ते नाशिक – प्रथम,दीप्ती सुरेश ढवारे,मुंबई – द्वितीय.ईळके अक्षय मारुती,इचलकरंजी आणि लटपटे मंदार छाया गोविंद,कोद्री,परभणी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

    प्रथम,द्वितीय,तृतीय विजेत्यांना अनुक्रमे५००१,३००१,२००१ रु. प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह याची घोषणा करण्यात आली.परीक्षक म्हणून प्रा.डॉ.गणेश मोहिते,प्रा.डॉ.गोपीनाथ बोडखे,प्रा.आनंद देशमुखे यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.अभय शिंदे,तंत्रज्ञ सूत्रसंचालन डॉ.रवी सातभाई यांनी केले.डॉ.बाबासाहेब मुटकुळे,डॉ.सखाराम वांढरे यांनी आभार मानले.